For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

MH SCC Exam Result 2025 : काही तासांत दहावीचा निकाल, इंटरनेट नसेल तर SMS द्वारे कसा पहायचा?

11:02 AM May 13, 2025 IST | Snehal Patil
mh scc exam result 2025   काही तासांत दहावीचा निकाल  इंटरनेट नसेल तर sms द्वारे कसा पहायचा
Advertisement

काही तासांत निकाल समजणार असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांची उत्सुकता शिगेला

Advertisement

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये धाकधूक वाढली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांचे गुणपत्रक संकेतस्थळावर उपलब्ध होईल, तसेच त्याची प्रिंट काढून घेता येणार आहे.

दहावीची परीक्षा यंदा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च मार्चमध्ये घेण्यात आली. या परीक्षेत राज्यातील लाखो तर कोल्हापूर विभागातून 1 लाख 32 हजार 497 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. त्यामुळे येत्या काही तासांत निकाल समजणार असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Advertisement

आज दुपारी एक वाजता सर्वांना ऑनलाइन पद्धतीने हा निकाल पाहता येणार आहे. दरम्यान, कोल्हापूर विभागात 357 परीक्षा केंद्रावर 1 लाख 32 हजार 926 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात 54 हजार 810, सातारा जिल्ह्यात 38 हजार 497, सांगली जिल्ह्यात 39 हजार 619 तर अशी सुमारे 1 लाख 32 हजार 926 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे.

तर रत्नागिरी जिह्यातून 18 हजार 884 विद्यार्थी तर सिंधुदुर्ग जिह्यातून 9 हजार 7 विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले आहेत. नुकताच बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. कोकणच्या विद्यार्थ्यांनी सलग 14 व्या वर्षीही या परीक्षेत गुणवत्तेच्या जोरावर राज्यात अव्वल स्थान कायम राखले आहे. त्यामुळे आता दहावीच्या परीक्षेत कोणता विभाग बाजी मारणार हे पाहणे औत्सुकत्याचे ठरणार आहे.

या विद्यार्थ्यांना https://sscresult.mahahsscbord.in/  http://sscresult.mkcl.org या संकेतस्थळावरून दहावीचा निकाल पाहता येणार आहे. राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांच्या सहीने निकालाचे परिपत्रक जाहीर झाले आहे. गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधीत विभागीय मंडळाकडे ऑनलाईन अर्ज पाठवण्यासाठी 14 ते 28 मेपर्यंत करता येणार आहे.

विद्यार्थ्यांनी स्वत: किंवा महाविद्यालयातर्फे https://mahahsscboard.in या संकेतस्थळावर अर्ज करावयाचा आहे. दहावी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्यानंतर पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्द्तीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

इंटरनेट सुविधा नसल्यास SMS द्वारे असा पाहण्यासाठी

  • तुमच्या मोबाइलमध्ये SMS अॅपवर जा.
  • क्रिएट न्यू मेसेजवर क्लीक करा.
  • MHSSC(स्पेस) सीट क्रमांक (उदा. 123456) हे डिटेल्स भरा.
  • हा मेसेज 57766 या क्रमांकावर पाठवा.
  • काही मिनिटांतच तुमच्या फोनवर निकालाचा तपशील येईल.
Advertisement
Tags :

.