सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्राने पाठपुरावा करणे गरजेचे
तालुका म. ए. समितीच्या बैठकीत कर्नाटक शासनाचा निषेध
प्रतिनिधी/ खानापूर
सीमाप्रश्नाची सोडवणूक होईपर्यंत सीमाप्रश्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र सरकारने यासाठी आग्रहाची भूमिका घेऊन केंद्रावर दबाव आणून सीमाप्रश्नाची सोडवणूक करून कर्नाटकाच्या जोखडातून आम्हाला मुक्त करावे. सीमाप्रश्न सुटेपर्यंत तालुक्यातील मराठी भाषिकांनी समितीच्या झेंड्याखाली एकीने राहणे गरजेचे आहे. सीमाप्रश्नाबाबत शरद पवार हेच एक आशास्थान आहे. त्यांच्या माध्यमातून सीमाप्रश्न सुटू शकतो, असे वक्तव्य माजी आमदार दिगंबर पाटील यांनी 1 नोव्हेंबर काळादिनाच्या निषेध सभेत बोलताना व्यक्त केले.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने 1 नोव्हेंबर काळा दिन पाळण्यात आला. येथील शिवस्मारकातील माजी आमदार कै. व्ही. वाय. चव्हाण सभागृहात सकाळी 10 ते 2 पर्यंत लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यानंतर सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई होते. प्रास्ताविक आबासाहेब दळवी यांनी केले.
यावेळी पांडु सावंत म्हणाले, आम्ही महाराष्ट्रात जाण्यासाठी जे जे करता येईल ते ते करत आहोत. यापुढील काळात समितीच्या माध्यमातून सीमाप्रश्न सोडवून घेण्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. प्रकाश चव्हाण म्हणाले, तालुक्यातील तसेच सीमाभागातील राजकीय स्थित्यंतरे पाहता आता सीमाप्रश्न सोडवून घेण्यासाठी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून सीमाप्रश्न सोडवून घेणे गरजेचे आहे. अन्यथा येत्या काळात मराठी भाषा आणि संस्कृतीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. यावेळी विलास बेळगावकर म्हणाले, सीमाप्रश्नाचा लढा गेली 67 वर्षे आम्ही न्याय मार्गाने लढत आहोत. मात्र केंद्राने आम्हाला न्याय दिला नाही. कर्नाटक सरकार मराठी भाषा आणि संस्कृती संपवण्यासाठी अटोकाट प्रयत्न करत आहे. सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सीमाचळवळ नेटाने नेणे गरजेचे आहे. राजाराम देसाई म्हणाले, मराठी भाषिकांत आजही सीमाप्रश्नाबद्दल तळमळ आहे. आणि 67 वर्षाच्या कर्नाटकी जुलुमला थोपवण्यासाठी तऊण शक्ती असणे गरजेचे आहे. निरंजन सरदेसाई म्हणाले, लढ्याचा प्रदीर्घ कालावधी पाहता गांभीर्याने विचारमंथन करणे गरजेचे आहे. मराठी भाषा आणि संस्कृती टिकवण्यासाठी सीमाप्रश्नाचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे. मुरलीधर पाटील म्हणाले, सीमाप्रश्नासाठी महाराष्ट्र सरकारवर दबाव आणणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्रात सीमाप्रश्नाबद्दल आवाज उठविणे गरजेचे आहे.
शंकर गावडा म्हणाले, 1 नोव्हेंबर आमच्यासाठी काळा दिवस आहे. गेल्या 67 वर्षात आम्ही कर्नाटक सरकारच्या विरोधात आजही त्याच आवेशाने लढत आहोत. येत्या काळात तालुक्यात समितीची संघटना मजबूत करून विरोधी पक्षाची भूमिका बजावणे गरजेचे आहे. आणि सामाजिक समस्या सोडवण्यासाठी सरकारवर दबाव आणणे आवश्यक आहे. सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी चळवळ तीव्र कऊया.
यावेळी मारुती परमेकर म्हणाले, लढ्याचा 67 वर्षाचा इतिहास आहे. आज महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्न न्यायालयात दाखल केल्याने न्यायप्रविष्ट असला तरी आम्हाला रस्त्यावरची लढाई दिलीच पाहिजे. तसेच महाराष्ट्र सरकारने दिल्ली दरबारी हा प्रश्न उपस्थित करून सीमाप्रश्न सोडवून घेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. मराठी भाषिकांनी समितीच्या झेंड्याखाली एकदिलाने राहणे काळाची गरज आहे. यावेळी जगन्नाथ बिरजे म्हणाले, तालुक्यातील मराठी भाषिकांनी समितीच्या झेंड्याखाली येणे गरजेचे आहे. जे मराठी भाषिक समितीपासून दुरावलेले आहेत. त्यांनी पुन्हा समितीच्या झेंड्याखाली आणणे गरजेचे आहे.
बाळाराम शेलार म्हणाले, 1956 पासून अन्यायाविऊद्ध आम्ही लढत आहोत. महाराष्ट्र सरकारने न्यायालयीन लढाई सातत्याने पाठपुरावा करून सीमाप्रश्नाचा सोक्षमोक्ष लावावा. गोपाळ पाटील म्हणाले, सीमाप्रश्न न्यायप्रविष्ट असला तरी महाराष्ट्र सरकारने केंद्रावर दबाव आणून सीमाप्रश्नाची सोडवणूक करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र सरकार सीमाप्रश्नाकडे गांभीर्याने पहात नसल्याने सीमाप्रश्न लोंबकळत पडला आहे. जयराम देसाई, हणमंत जगताप यासह अनेकांची निषेध व्यक्त करणारी भाषणे झाली.
यावेळी सीमासत्याग्रही शंकर पाटील, रमेश धबाले, तुळजाराम गुरव, विठ्ठल गुरव, मऱ्याप्पा पाटील, संजय पाटील, मल्हारी खांबले, सुनील पाटील, मारुती दे. गुरव, कृष्णा मन्नोळकर, रविंद्र शिंदे, अर्जुन सिद्धाणी, प्रवीण पाटील, अनिल पाटील, ऊक्माण्णा झुंजवाडकर, पंकज सावंत, मधुकर पाटील, जयसिंगराव पाटील, राजेश अंद्रादे, अजित पाटील, केशव कळळेकर, बी. बी. पाटील, तुकाराम जाधव, कल्लाप्पा कोडचवाडकर, डी. एम. भोसले, ब्रम्हानंद पाटील, म्हात्रू धबाले, कृष्णा कुंभार, यशवंत पाटील यासह समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कर्नाटक सरकारचा निषेध करण्यासाठी येथील शिवस्मारकात म. ए. समितीच्यावतीने सकाळी 10 पासून लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. यानंतर दुपारी 3 वाजता सभा घेण्यात आली. बाहेरुन आलेल्या कन्नडिगानी राज्योत्सवाची मिरवणूक डिजेचे सर्व नियम धाब्यावर बसवून डिजेचा आवाज पूर्ण क्षमतेने लावून येथील शिवस्मारक चौकात धिंगाणा घालत मिरवणूक काढण्यात आली होती. समिती कार्यकर्त्यांनी या डिजेच्या आवाजाला दाद न देता निषेध सभा पार पडली. निषेध सभा संपताच डिजे बंद करण्यात आला.