For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एपीएमसी बाजारात महाराष्ट्र नवीन कांदा आवक सुरू

06:03 AM Dec 17, 2023 IST | Tarun Bharat Portal
एपीएमसी बाजारात महाराष्ट्र नवीन कांदा आवक सुरू
Advertisement

दरात कमालीची घसरण : सर्वसामान्यांना दिलासा : रताळ्याचीही विक्रमी आवक

Advertisement

सुधीर गडकरी/ अगसगे

बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये महाराष्ट्रातील कांदा आवक सुरुवात झाली आहे. यामुळे कांदा भाव प्रतिक्विंटलला 1 हजार रुपयांनी घसरण झाली आहे. तर बेळगाव जवारी बियाण्याचा बटाट्याचा भाव क्विंटलला 1500 रुपयांनी वाढला आहे. इंदौर, जुना बटाट्याचा भाव 200 रुपयांनी तर इंदौर नवीन बटाट्याचा भाव 100 रुपयांनी वाढला आहे. आग्रा बटाटा व तळेगाव (पुणा) बटाट्याचा भाव मात्र स्थिर आहे. भाजीमार्केटमध्ये काही भाजीपाल्यांचे दर किंचित प्रमाणात वाढले आहेत. तर काहींचे भाव स्थिर आहेत. सध्या मार्केट यार्डमध्ये शनिवारच्या बाजारात इंदौर व जवारी बटाट्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. बटाटा खरेदीसाठी खरेदीदारांची बाजारात धावपळ सुरू होती. महाराष्ट्र कांदा व कर्नाटक कांदा बाजारात आवकेत वाढ झाल्याचा परिणाम पुन्हा शनिवारी 1 हजार रुपयांनी घसरला असून कांदा भाव क्विंटलला 1000 ते 2700 रुपये पर्यंत झाला.

Advertisement

मागील शनिवारच्या बाजारात कर्नाटक कांदा 2000 ते 3500 रुपये झाला होता. तर महाराष्ट्र जुना कांदा भाव 2000 ते 4000 रुपये झाला होता. तर बुधवार दि. 13 रोजी महाराष्ट्र कांदा भाव 2000 ते 3500 रुपये झाला तर कर्नाटक कांदा 1500 ते 3000 रुपये झाला होता. शनिवारच्या बाजारात कांदा आवकेत वाढ झाली. यामुळे पुन्हा कांदा भाव 1 हजार रुपयांनी कमी झाला आहे.

महाराष्ट्र कांदा मार्केटयार्डमध्ये दाखल

महाराष्ट्रामध्ये कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. संपूर्ण देशाला वर्षभर पुरेल इतके उत्पादन महाराष्ट्रामध्ये घेतले जाते. पहिल्या टप्प्यामध्ये लागवड केलेले कांदा उत्पादनाला काढणीला प्रारंभ झाला आहे. देशभरातील विविध बाजारात कांदा सध्या विक्रीसाठी महाराष्ट्रातून जात आहे. याचप्रमाणे बुधवार दि. 13 पासून बेळगाव मार्केटयार्डमध्ये कांदा आवकेस प्रारंभ झाला आहे. शनिवारी दोन पटीने आवक वाढली. सध्या गोवा, कोकणपट्टा, मुधोळ, राणेबेन्नूर, कारवार, दांडेली, खानापूर, जिल्हा बेळगाव जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नवीन कांद्याला मागणी आहे. महाराष्ट्र कांदा आवकेस प्रारंभ झाल्याने खरेदीदार व व्यापाऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

कांदा दरात निम्म्याने घसरण

देशभरामध्ये विविध बाजारात महाराष्ट्र कांदा विक्रीसाठी जात असल्याचा परिणाम क्विंटलला कांदा भाव आठवडाभरामध्ये 2500 रुपयांनी घसरण झाली आहे. 3000 ते 5000 रुपये झालेला क्विंटलचा भाव सध्या 1000 ते 2500 रुपयांवर येऊन पोहचला आहे. सध्या कांदा थोड्या प्रमाणात कच्चा, ओलसर येत आहे. वाळलेला कांदा जानेवारीनंतर येणार आहे. यापूढे आवक देखील वाढणार आहे. यावेळी कांदा भाव टिकून राहणार की वाढणार यावेळच्या आवकेवर अवलंबून राहणार आहे, अशी माहिती कांदा व्यापाऱ्यांनी दिली.

जवारी बी, बटाट्याचा भाव वाढला

बेळगाव, खानापूर तालुक्यातील जवारी बटाटा आवक आटोक्यात आली आहे. जवारी बटाटा आवक सुमारे 500 पोती विक्रीसाठी दाखल झाली होती. तर बेळगाव व खानापूर तालुक्यामध्ये रब्बी हंगामासाठी, उन्हाळी बटाटा लागवड केली जाते. यासाठी जवारी बटाटा मीडियम व मोठवड बटाटा शेतकरी बियाणे म्हणून खरेदी करतात. सध्या जवारी बटाटा आवक जवळपास संपत आला असून, बियाण्याचा बटाट्याचा भाव क्विंटलला 500 रुपयांनी वाढ झाली आहे. बियाण्याचा भाव 2000 ते 3000 रुपयेप्रमाणे विक्री झाली. गोळा बटाटा 2500 ते 2700 रुपये भाव झाला आहे, अशी माहिती अडत व्यापाऱ्यांनी दिली.

इंदोर बटाटा आवकेत घट

सध्या इंदोरमध्ये बटाटा काढणीला प्रारंभ झाला आहे. बाजारात कचवड, इंदोर बटाटा मोजक्याच दुकानामध्ये येत आहे. तर जुना इंदोर बटाटा जवळपास संपला आहे. आठवड्यामध्ये एक-दोन ट्रक बटाटा मार्केटयार्डमध्ये विक्रीसाठी येत आहे. नवीन बटाट्यापेक्षा जुना इंदोर बटाट्याला खरेदीदारांची मागणी आहे. कारण नवीन इंदोर बटाटा कचवड सोलपट गेलेली आहेत. बटाट्याला माती चिकटून आहे व बटाटा घट असल्यामुळे हॉटेल व किरकोळ खरेदीदारांतून मागणी अल्पप्रमाणात आहे. नवीन इंदोर बटाटा भाव 1800 ते 2000 रुपये क्विंटल आहे. तर जुना इंदोर बटाटा 2100 ते 2300 रुपये क्विंटल आहे.

तळेगाव (पुणा) आग्रा बटाटा भाव स्थिर

गेल्या सुमारे दोन-तीन महिन्यापासून आग्रा बटाटा आवक सुरू झाली आहे. तर दोन आठवड्यापासून पुणा-तळेगाव बटाटा मार्केटयार्डमध्ये विक्रीसाठी येत आहे. आग्रा बटाटा, किरकोळ विक्रीसाठी व काही ठिकाणी पावभाजी बनवण्यासाठी वापरण्यात येतो. तसेच तळेगाव बटाटा काही मोजक्या हॉटेल व किरकोळ विक्रीसाठी वापरण्यात येतो. तळेगाव बटाट्याला म्हणावी तशी मागणी नसते. आग्रा बटाटा भाव 1300 ते 1700 रुपये तर तळेगाव बटाटा भाव 1500 ते 2000 रुपये झाला असून या दोन बटाट्यांचा भाव प्रति क्विंटलला स्थिर असल्याची माहिती बटाटा अडत व्यापाऱ्यांनी दिली.

तीस हजार पिशव्या रताळी आवक

बेळगाव, खानापूर तालुक्यामध्ये यंदा रताळी उत्पादन मोठ्याप्रमाणात घेण्यात आले होते. मात्र पावसाअभावी रताळीची वाढ खुंटली होती. तसेच किडकी रताळ्याचे उत्पादन अधिक प्रमाणात झाले. यामुळे सध्या रताळ्याला भाव क्विंटलला 300 ते 1000 रुपये प्रमाणे भाव मिळत आहे. रताळ्याची बाजारात भरमसाठ आवक दाखल झाली असून शनिवारी सुमारे 30 हजार पिशव्या रताळ्याची आवक विक्रीसाठी दाखल झाली होती.

भाजीपाल्याचे भाव किंचित वाढ

भाजी मार्केटयार्डमध्ये मटर, कोबी, भेंडी, दोडकी, शेवग्या शेंगा, बिन्स, बिट, मेती, लाल भाजी यांच्या दरात किंचित वाढ झाली आहे. तर अल्ले, लिंबू व चायणा कोथिंबीर यांच्या दरात किंचित प्रमाणात घसरण झाली आहे. तर इतर भाजीपाल्यांचे दर स्थिर असल्याची माहिती भाजी व्यापाऱ्यांनी दिली

Advertisement
Tags :

.