For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कमी पटसंख्येच्या शाळेबाबत काय म्हणाले? शिक्षण मंत्री दीपक केसरकर

12:39 PM Dec 22, 2022 IST | Abhijeet Khandekar
कमी पटसंख्येच्या शाळेबाबत काय म्हणाले  शिक्षण मंत्री दीपक केसरकर
Advertisement

dipakkesarkar- ० ते २० पटसंख्येच्या शाळा सध्या बंद करणार नाही. असे कोणतेही परिपत्रक काढलेले नाही. केवळ सर्वेक्षणाचे आदेश दिले आहे, सर्वाना विश्वासात घेऊनच निर्णय घेऊ. गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हा शासनाचा उद्देश आहे, असं स्पष्टीकरण शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत बोलताना दिले.

Advertisement

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी ० ते २० पटसंख्येच्या शाळा बंद होणार असल्याच्या मुद्द्यावर आज लक्षवेधी मांडण्यात आली. यादरम्यान चर्चेत विरोधकांनी अतिशय आक्रमकपणे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. अनेक आमदारांनी आपापल्या भागातील शाळांविषयीच्या समस्या मांडल्या. यावर उत्तर देताना केसरकरांनी एकही शाळा बंद करणार नाही, असं रोखठोकपणे सांगितलं

काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांचं समाधान झालं नाही.एक बालक असेल तरी त्याला सर्व सुविधा देणे हे शासनाची जबाबदारी आहे. सर्वेक्षणातून शिक्षण विभागात गोंधळ निर्माण केला जात आहे. अद्याप विचार नाही असे उत्तर नको. स्पष्ट उत्तर द्या, अशा शब्दात त्यांनी केसरकरांना खडसावलं.
त्यावर "आम्ही एकही शाळा बंद करणार नाही. एक किलोमीटरच्या आत शिक्षण देण्याचे बंधन आहे. शाळा बंद करण्यासंदर्भात कुठलाही निर्णय शासनाने घेतला नाही" असेही केसरकर म्हणाले.

Advertisement

Advertisement
Tags :

.