Maharashtra MLC Election विधानपरिषदेसाठी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती राज्यात १७ ठिकाणी होणार अशा लढती...
महाराष्ट्र विधानपरिषदेची निवडणूक तोंडावर आली असताना अजूनही काही ठिकाणी जागावाटपाविषयी संभ्रम आणि नाराजी असलेली दिसत आहे. असे असले तरी जाहीर झालेल्या जागांमध्ये होणारी लढत कशी असणार याचीही उत्सुकता लागून राहिलेली आहे. कार्यकाल पूर्ण झालेल्या एकूण १७ जागांसाठी असणार आहे. ही निवडणूक थेटपणे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी होणार असून एकूण १७ जागांसाठी मैदानात उतरलेल्या उमेदवारांमध्ये पुढीलप्रमाणे लढत असणार आहे.
महायुतीचे जागा वाटप
महायुतीच्या जागा वाटपामध्ये ११ जागा भाजपला, ४ शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाला तर २ जागा राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) पक्षाला मिळाल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या जागावाटपाबद्दल नाराजी व्यक्त केली असली तरी हेच सूत्र कायम राहणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे.
महाविकास आघाडीचे जागावाटप
महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्या जागावाटपातही काही काळापूर्वी मतभेद निर्माण झाले होते. सध्या महाविकास आघाडीचे जागावाटप काँग्रेस ८, शिवसेना ६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस ३ असे ठरले आहे.
१७ मतदारसंघातील प्रमुख लढती, आमने-सामने कोण?
१. सोलापूर - काँग्रेस मविआचे आदित्य फत्तेपूरकर विरुद्ध भाजप महायुतीचे राजेंद्र राऊत
२. अहिल्यानगर- काँग्रेस मविआचे करण ससाणे विरुद्ध भाजप महायुतीचे प्राजक्त तनपुरे
३. ठाणे - राष्ट्रवादी काँग्रेस मविआचे अभिजीत पवार विरुद्ध शिवसेना महायुतीचे रविंद्र फाटक
४. जळगाव - शिवसेना ठाकरे मविआचे शरद तायडे विरुद्ध भाजप महायुतीचे नंदकिशोर महाजन
५. सांगली - सातारा - राष्ट्रवादी काँग्रेस मविआचे बाळासाहेब पाटील-अभयसिंह जगताप विरुद्ध भाजप धैर्यशील माने
६. नांदेड - काँग्रेस मविआचे रामदास पाटील विरुद्ध भाजप महायुतीचे अमर राजूरकर
७. यवतमाळ - काँग्रेस मविआचे साहेबराव कांबळे विरुद्ध शिवसेना महायुतीचे दुष्यंत चतुर्वेदी
८. पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस मविआचे श्रीकांत पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे विक्रम काकडे
९. भंडारा - गोंदिया - काँग्रेस मविआचे दिलीप बनसोड विरुद्ध भाजप महायुतीचे अविनाश ब्राह्मणकर
१०. रायगड - रत्नागिरी - सिंधुदुर्ग - ठाकरे गटाचे बाळ माने विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे अनिकेत तटकरे
११. नाशिक - मविआचा उमेदवार नाही, अपक्ष विरुद्ध शिवसेना महायुतीचे नरेंद्र दराडे
१२. वर्धा - चंद्रपूर - गडचिरोली - काँग्रेस मविआचे शैलेश अग्रवाल विरुद्ध भाजप महायुतीचे अरुण लखानी
१३. अमरावती - काँग्रेस मविआचे हर्षदीप देशमुख विरुद्ध भाजप महायुतीचे प्रवीण पोटे
१४. धाराशिव - लातूर - बीड - काँग्रेस मविआचेचे महेश देशमुख विरुद्ध भाजप महायुतीचे बसबराज पाटील
१५. परभणी - हिंगोली - शिवसेना मविआचे डॉ. विवेक नावंदर विरुद्ध शिवसेना महायुतीचे सईद खान
१६. छत्रपती संभाजीनगर - जालना - शिवसेना ठाकरे गट विरुद्ध भाजप किंवा शिवसेना
१७. नागपूर (पोटनिवडणूक) - काँग्रेस मविआचे अतुल लोंढे विरुद्ध भाजप महायुतीचे डॉ. राजीव पोतदार.