For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पदवीधर-शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचा बिगुल; 23 ऑक्टोबरला मतदान; 27 ऑक्टोबरला मतमोजणी

04:58 PM Sep 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
पदवीधर शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचा बिगुल  23 ऑक्टोबरला मतदान  27 ऑक्टोबरला मतमोजणी
Advertisement

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्यातील पाच मतदारसंघांसाठी 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान, तर 27 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर 22 सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Advertisement

या निवडणुकीत तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. पदवीधर मतदारसंघांमध्ये पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागांचा, तर शिक्षक मतदारसंघांमध्ये पुणे आणि अमरावती विभागांचा समावेश आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार 29 सप्टेंबरला अधिसूचना, 6 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल, 7 ऑक्टोबरला अर्जांची छाननी आणि 9 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. मतदान 23 ऑक्टोबरला सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत होणार आहे.

Advertisement

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने संबंधित मतदारसंघांमध्ये आता उमेदवारांची निवड, अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आणि प्रचाराला वेग येणार आहे.

Advertisement
Tags :

.