For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sikandar Shaikh Accident | सकाळी साडेसहाची 'ती' वेळ अन् अचानक राष्ट्रीय महामार्गावर काळजाचा ठोका चुकला; सिकंदर शेखच्या थारचा भीषण अपघात!

01:17 PM Jun 11, 2026 IST | NEETA POTDAR
sikandar shaikh accident   सकाळी साडेसहाची  ती  वेळ अन् अचानक राष्ट्रीय महामार्गावर काळजाचा ठोका चुकला  सिकंदर शेखच्या थारचा भीषण अपघात
Advertisement

सांगली : महाराष्ट्राच्या कुस्ती विश्वातीललोकप्रिय आणि महाराष्ट्र केसरी किताब विजेते पैलवान सिकंदर शेख यांच्या मालकीच्या थार वाहनाचा भीषण अपघात झाला. कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी परिसरात रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात घडला. अपघातात गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला असला तरी सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.

Advertisement

दरम्यान, सिकंदर शेख या अपघातातून पूर्णपणे सुखरूप बचावल्याची दिलासादायक माहिती वस्ताद अस्लम काझी यांनी दिली आहे. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी परिसरात आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. सिकंदर शेख यांच्या मालकीची थार गाडी रस्त्यालगतच्या डिव्हायडरला धडकल्याने वाहनाच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. अपघाताचे छायाचित्र समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

डिव्हायडरला धडकल्याने बोनेट आणि पुढील भागाचे नुकसान झाले. सुदैवाने सिकंदरला कोणतीही दुखापत झालेली नाही. तो पूर्णपणे सुखरूप आहे. प्राथमिक माहितीनुसार, चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. भरधाव वेगातील थार डिव्हायडरवर आदळल्याने धडकेची तीव्रता मोठी होती. त्यामुळे वाहनाचा पुढील भाग अक्षरशः चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, कुस्तीप्रेमी आणि सिकंदर शेख यांचे चाहते घटनास्थळी दाखल झाले.

Advertisement

महामार्ग पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून अपघाताच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू आहे. सिकंदर शेख हे महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रातील सर्वाधिक लोकप्रिय पैलवानांपैकी एक मानले जातात. त्यामुळे त्यांच्या अपघाताची बातमी समोर येताच सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली जात होती. मात्र सिकंदर पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Advertisement
Tags :

.