खुपिरे येथे महाराष्ट्र केसरी निवड
चाचणी स्पर्धेचा शानदार शुभारंभ-
निवड चाचणीत २७० पैलवानांचा सहभाग -
महाराष्ट्र केसरी गटात शुभम सिदनाळे याची विजयी सलामी
कोल्हापूर
खुपिरे (ता. करवीर) येथे कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने व धनंजय महाडिक युवाशक्ती खुपिरे यांच्यावतीने ६६ व्या वरिष्ठ माती व गादी राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी, तसेच ४५ व्या कुमार राज्य अजिंक्यपद कोल्हापूर जिल्हा व शहर निवड चाचणी स्पर्धेचा करवीरचे नवनिर्वाचित आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते शानदार शुभारंभ करण्यात आला. या स्पर्धेत शहर व जिल्ह्यातील २७० पैलवानांनी सहभाग घेतला आहे.
महाराष्ट्र केसरी गटातील पहिली लढत शुभम सिदनाळे (दत्तवाड) व भूषण माळकर (पेठ वडगाव) यांच्यात झाली. या लढतीत शुभम सिदनाळे याने सुरुवातीपासून आक्रमक कुस्ती करत भूषण माळकर यांच्यावर पूर्वार्धात ६ गुणांची नोंद केली.उत्तरार्धात पुन्हा आक्रमक खेळी करत शुभमने भूषणवर १० विरुद्ध ० गुणांनी मात करून विजयी सलामी दिली.
चाचणी स्पर्धेतील पहिल्या फेरीतील विजेते मल्ल पुढील प्रमाणे-
९२ किलो निशांत पाटील (सडोली), ८६ किलो कौतुक डाफळे (पिंपळगाव), ७९ किलो उत्कर्ष शेळके (येवती) पार्थ कुमठाळे (तेरवाड) अक्षय साळवी (बानगे) ओमकार पाटील (खटांगळे), ७० किलो माऊली टिपूगडे (बेले) प्रथमेश लांडगे (वाशी) आकाश कापडे (अणुर) कुलदीप पाटील (राशिवडे), ६५ किलो सुशांत पाटील (म्हारुळ) यश पाटील (बेलवळे बुद्रुक) यश मगदूम (कांडगाव) सद्दाम शेख (दऱ्याचे वडगाव) ६१ किलो निखिल कोळी (तळसंदे) शुभम चौगु)ले (नंदगाव) ५७ किलो हर्षद जाधव (इंगळी).
यावेळी कुंभीचे संचालक संजय पाटील, गोकुळचे संचालक एस.आर.पाटील, संयोजक युवाशक्तीचे प्रमुख शहाजी गिरी, दीपक पाटील,विलास पाटील,अनिल हराळे, तसेच इंद्रजीत पाटील, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस डॉ.आनंद गुरव, भाजपा करवीर अध्यक्ष दत्ता मेडसिंगे,कुंभी बँक संचालक प्रा.एस.पी.चौगले, संजय सखाराम पाटील,संजय डी.पाटील,सखाराम पाटील, एस.के.पाटील, एच.एस.पाटील, आनंदा पाटील, अशोक माने,लक्ष्मण पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. दिगंबर पाटील, संतोष कालकुटकी, भिकाजी पन्हाळकर, सुशांत पाटील, विकास पाटील, चंद्रकांत हराळे, रवी हराळे, युवराज पाटील ,सुभाष पाटील, संभाजी पाटील, पवन पाटील यांनी कुस्ती स्पर्धेचे संयोजन केले आहे.या चाचणी निवड स्पर्धेसाठी मातीचा आखाडा व मॅटची तयारी करण्यात आली आहे.माती व मॅट विभागात विभागात ५७,६१,६५,७०,७४,७९,८६,९२,९७ आणि महाराष्ट्र केसरी गटासाठी ८६ ते १२५ किलो वजन गटातील चाचणी स्पर्धा घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र केसरी पदासाठी या निवड चाचणीतून पैलवानांची निवड करण्यात येणार आहे.
ऑलिंपिकचे ध्येय ठेवावे-
आमदार चंद्रदीप नरके यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी साता समुद्रा पलीकडे कुस्ती नेल्याचे सांगून जिल्ह्यातील पैलवानांनी फक्त महाराष्ट्र केसरीचे ध्येय न ठेवता ऑलिम्पिकचे पदक मिळवून जिल्ह्याचे नाव साता समुद्रा पलीकडे न्यावे असे आवाहन केले.
संयमाने स्पर्धा घ्यावी-
आमदार चंद्रदीप नरके यांनी पैलवानांनी या चाचणी स्पर्धेत कोणत्याही प्रकारचा वाद-विवाद न करता संयमाने चाचणी स्पर्धेत सहभागी होऊन आपापली गुणवत्ता सिद्ध करावी असे आवाहन केले.