आटपाडीत महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यत
आटपाडी :
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विनायकराव मासाळ यांच्या वाढदिवसाचे औाचित्य साधून आटपाडीमध्ये ’महाराष्ट्र केसरी’ बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली आहे. 31 जानेवारी रोजी या भव्य बैलगाडा शर्यती होणार असून महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रकमेची रोख पारितोषिके व चषक देवून विजेत्यांना मंत्री महोदयांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
मासाळवाडीचे सुपुत्र विनायक मासाळ यांनी अत्यंत कमी वयात राजकीय, सामाजिक, उद्योग, व्यवसाय क्षेत्रामध्ये कामाचा ठसा उमटवला आहे. अनेकांना आर्थिक स्थैर्य मिळवून देणे, गरजूंना आर्थिक मदत करणे, दिव्यांगांना आणि शालेय विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करणे असे उपक्रम ते राबवत आहेत. या युवक नेत्याच्या वाढदिवसानिमित बैलगाडा शर्यतीचे आयोजन करत ही परंपरा जोपासणाऱ्या बैलगाडा मालकांना एकूण सुमारे 11 लाखाहून अधिक ऊपयांची रोख बा†क्षसे मंत्री दत्तामामा भरणे, मंत्री शंभूराजे देसाई व मान्यवरांच्या हस्ते प्रदान केली जाणार आहेत.
ा†वनायकराव मासाळ युथ फाऊंडेशन आा†ण पंचप्रेमी गां†दरा यांनी महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रकमेच्या महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. माजी खासदार संजय पाटील, आमदार सुहास बाबर, आमदार इा†द्रस नायकवाडी, आमदार बाबासाहेब देशमुख, ा†जल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, आयकर उपायु‹ डॉ. सा†चन मोटे, शा†शकांत तरंगे, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, राष्ट्रवादीचे ा†जल्हाध्यक्ष प्रताप पाटील, भैय्यासाहेब बंडगर, ा†वष्णू माने, मनोज सरगर, राहुल हजारे यांच्यासह ा†वा†वध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत शर्यतीचे उद्घाटन होणार आहे.
महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीतील पा†हल्या क्रमांकाच्या ा†वजेत्याला पाच लाख 9 हजार ऊपये रोख रक्कम व चषक, ा†द्वतीय क्रमांकासाठी तीन लाख व चषक, तृतीय क्रमांकासाठी एक लाख, चौथ्या क्रमांकासाठी 80 हजार, पाचव्या क्रमांकासाठी 50 हजार सहाव्या क्रमांकासाठी 40 हजार, सातव्या क्रमांकासाठी 30हजार ऊपये आा†ण चषक अशी एकूण रोख 11 लाखाहून आ†धकची बा†क्षसे ा†दली जाणार आहेत. सेमी फायनलमध्ये दोन नंबर उतरणाऱ्या गाडीस अकरा हजार ऊपये व चषक ा†दला जाणार आहे.
आटपाडी मध्ये होणाऱ्या महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीसाठी सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे यासह संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो बैलगाड्या मैदानात उतरणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात अनेक मैदानी गाजा†वणारे नामवंत बैलगाडा मालक, बैलगाडा चालक, आा†ण प्रा†सद्ध बैल जोड्या यांचा थरार आटपाडी मध्ये अनुभवता येणार आहे. या शर्यतींचा लाभ शेतकरी, पशुपालक, बैलगाडा मालकांसह नागा†रकांनी घ्यावा, असे आवाहन ा†वनायकराव मासाळ युथ फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे.