महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

महाराष्ट्र - कर्नाटक प्रांतवाद हरला आणि राष्ट्रीय एकोपा इथ जिंकला ..!!!

04:11 PM Jun 23, 2024 IST | Abhijeet Khandekar
२०
Advertisement

महाराष्ट्र - कर्नाटक प्रांतवाद हरला आणि राष्ट्रीय एकोपा इथ जिंकला ..!!!

Advertisement

गाव महाराष्ट्रात पण बेंदूर कर्नाटकी साजरा!!
-
पाटील वाड्यावर कर तोडणे कार्यक्रम उत्साहात!!
म्हैसाळ वार्ताहर
म्हैसाळ ता.मिरज येथे परंपरेनुसार बैलपोळा ( बेंदूर) उत्साहात साजरा.तसे पाहिले तर म्हैसाळ हे गाव महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील दक्षिणेकडील शेवटचं गाव आहे मात्र अनेक ‌वर्षापासून परंपरेनुसार इथे कर्नाटक बेंदूर साजरा केला जातो.तर पलिकडे कर्नाटक हद्दीतील कागवाड येथे ‌महाराष्ट्र बेंदूर साजरा केला जातो.यानिमित्ताने परंपरेनुसार गावातील मध्यभागी असलेल्या दोन्ही ‌पाटील‌ वाड्यावर कर तोडणे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.थोरले पाटील म्हणजे माजी पोलीस पाटील अण्णासाहेब पाटील तर धाकटे पाटील म्हणजे डॉ.बापूसाहेब पाटील यांच्या वाड्यावर कर‌ तोडणे हा बळीराजा चा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी शेकडो शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.मानकरी व ८ बैलजोडी यांची मिरवणूक काढून पाटील ‌वाड्यावर पूजन करण्यात आले.मानकरी शेतकरी ‌यांनी पेरणीचा मोगना,कुरि घेऊन शेणाचे शिंपण करीत फेरी काढली व शेवटी बांधलेले तोरण,दोरी तोडत बैलजोड्या धावत गेल्या.‌यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी एकच जल्लोष करीत फटाक्यांच्या आतिषबाजीत मिरवणूक काढली.अशा‌ प्रकारे कर्नाटक बेंदूर महाराष्ट्रात उत्साहात साजरा करण्यात आला.

Advertisement

Advertisement
Tags :
Maharashtra-Karnatakanational unity wonprovincialism
Next Article