For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डॉ. रुपेश पाटकर, वामन पंडित यांना महाराष्ट्र फाऊंडेशनचे पुरस्कार जाहीर

01:07 PM Nov 17, 2024 IST | अनुजा कुडतरकर
डॉ  रुपेश पाटकर  वामन पंडित यांना महाराष्ट्र फाऊंडेशनचे पुरस्कार जाहीर
Advertisement

सावंतवाडी : प्रतिनिधी
अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे (अमेरिका) ‘सुनील देशमुख महाराष्ट्र फाऊंडेशन साहित्य आणि समाजकार्य पुरस्कार’ दिले जातात. यंदा बांदा-सावंतवाडी येथील डॉ. रुपेश पाटकर यांना समाजकार्य कार्यकर्ता (प्रबोधन) पुरस्कार तर वामन पंडित (कणकवली) यांना रा. शं. दातार नाटय पुरस्कार (संपादक, ‘रंगवाचा’) जाहीर झाला आहे. ५० हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. २०२४ यावर्षी साहित्यातील चार, समाजकार्यातील तीन आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार असे एकूण आठ पुरस्कारांची घोषणा महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्काराचे मासूमचे संयोजक डॉ. मनीषा गुप्ते आणि डॉ. रमेश अवस्थी, साधना ट्रस्टचे संपादक विनोद शिरसाठ आणि मुकुंद टाकसाळे यांनी केली. पुरस्कार प्रदान सोहळा १८ जानेवारी २०२५ रोजी एस.एम.जोशी सोशालिस्ट फाऊंडेशन, पुणे येथे सायंकाळी ५ ते ७.३० या वेळेत होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून महाराष्ट्रातील पहिल्या आयपीएस अधिकारी डॉ. मीरा चड्डा-बोरवणकर उपस्थित राहणार आहेत.याशिवाय फाऊंडेशनतर्फे दिलीप चित्रे साहित्य जीवनगौरव पुरस्कार (दोन लाख रुपये व स्मृतिचिन्ह) प्रा. आ. ह. साळुंखे (सातारा) यांना, ग्रंथ पुरस्कार (ललित) विलास शेळके (नाशिक, कादंबरी धरणसुक्त-पन्नास हजार रुपये व स्मृतिचिन्ह), अंजली चिपलकट्टी, पुणे यांना ग्रंथ पुरस्कार (माणूस असा का वागतो?-पन्नास हजार रुपये व स्मृतिचिन्ह), देवेंद्र सुतार (कटक-ओरिसा) यांना डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार (एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह), शरद जावडेकर यांना समाजकार्य विशेष पुरस्कार (एक लाख रुपये व स्मृतिचिन्ह), हसीना खान (मुंबई) यांना समाजकार्य कार्यकर्ता (संघर्ष) पुरस्कार- पन्नास हजार रुपये व स्मृतिचिन्ह जाहीर झाला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.