For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

11:10 AM Jun 28, 2024 IST | Abhijeet Khandekar
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
Maharashtra Electricity Contract Workers
Advertisement

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करताना महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे कर्मचारी

कोल्हापूर प्रतिनिधी

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज कंत्राटी कामगारांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता प्रशासनाने करावी, महाराष्ट्रात देखील हरियाना सरकार प्रमाणे कंत्राटदार मुक्त जॉब सिक्युरिटी द्यावी, वेतनात वाढ करावी, वीज कंपनीच्या होऊ घातलेल्या भरती मध्ये वयात वाढ, आरक्षण व मार्क द्यावेत इत्यादि मागण्या करिता सरकार जगाओ आंदोलनाच्या दुसऱ्या टप्यात गुरुवारी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघा तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

Advertisement

राज्यभर कंत्राटी कामगारांचे कंत्राटदारांच्या मार्फत होत असलेले आर्थिक शोषण व त्यास अधिकाऱ्यांचे अभय व संगनमत असल्याने कष्टकरी कामगाराला पूर्ण वेतन मिळत नाही, बोनस नाही, पेमेंट स्लीप नाही, डोक्यावर सतत रोजगाराची टांगती तलवार, जीव कधी जाईल सांगता येत नाही अपघात झाल्यास विमा नाही या बिकट अवस्थेत कामगार वर्षानुवर्षे सेवा देत आहे.त्यांच्या वेतनात वाढ करून हरियाणा सरकार प्रमाणे मध्यस्थी कंत्राटदारांना बाजूला सारून उपकंपनी तर्फे थेट कामगारांच्या बँक खात्यात वेतन देऊ असे आश्वासन डिसेंबर 2023 नागपूर अधिवेशनात ऊर्जामंत्री फडणवीसांनी देऊन सुद्धा त्याची पूर्तता न झाल्याने कामगार वर्गात तीव्र नाराजी आहे.
कंत्राटदार तुपाशी व कामगार उपाशी अशी वेळ आल्याने तिन्ही वीज कंपनीतील वीज कंत्राटी कामगार अन्यायाला वाचा फोडुन सरकारला जागे करण्यासाठी भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाकडून विधानसभा अधिवेशना दरम्यान 9 जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानावर सरकार जगाओ आंदोलन करणार आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात कर्मचारी मोठया संख्येने सहभागी झाले होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.