For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Monsoon Update राज्यातल्या अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, काही धरणांमधून विसर्ग सुरु

11:34 PM Jul 05, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
monsoon update राज्यातल्या अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली  काही धरणांमधून विसर्ग सुरु
Advertisement

राज्याच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाची तीव्रता अधिक असून, राज्यातील धरणे वेगाने भरत आहेत. यामुळे अनेक धरणांतून विसर्ग केला जात आहे. पाऊस तसेच धरणांतून विसर्ग सुऊ असल्याने अनेक भागांतील नद्या दुथडी भऊन वाहत आहेत. यामुळे किनारी भागात खबरदारीची सूचना देण्यात आली आहे. गोसीखुर्द, हतनूर, अप्पर वैतरणा धरणातून रविवारी सकाळी विसर्ग करण्यात आला. पावसाच्या माऱ्यामुळे कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, जगबुडी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

Advertisement

रविवारी सकाळी नोंदविलेला घाट भागातील पाऊस पुढीलप्रमाणे मिलीमीटरमध्ये
लोणावळा 175, वनगाव 134, शिरगाव 275, कोयना 210, धारावी 135, वळवण 229, खोपोली 285, कुंडली 180, भिवपुरी 154, खंड 165, निळशी 153, ठोकरवाडी 122, भिरा 386, डोंगरवाडी 398, दवडी 268, मुळशी पॅम्प 117, मुळशी 112, अंबोना 249, पोफळी 210, ताम्हिणी 310 मिमी.
मराठवाड्याकडे पावसाची पाठ
दरम्यान, मराठवाड्याच्या जिल्ह्यांत पावसाने पाठ फिरविली आहे. या भागात अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. विदर्भात या तुलनेत परिस्थिती बरी आहे. मात्र,या दोन्ही विभागाची दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

राज्यातील प्रमुख शहरातील पाऊस मिमिमध्ये पुढीलप्रमाणे
अहिल्यानगर 13.6, औरंगाबाद 10.4, डहाणू 17.5, हर्णे 156.8, जळगाव 4.2,कोल्हापूर 44, महाबळेश्वर 198.2, कुलाबा 265.6, सांताक्रूझ 227.7, नाशिक 15, उस्मानाबाद 2.2, पालघर 174, परभणी 1.5, रत्नागिरी 49.2, सांगली 15.5, सातारा 22, सोलापूर 2, ठाणे 177.4.

Advertisement

Advertisement
Tags :

.