महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट
Advertisement

PFI विरोधात पनवेलमध्ये मोठी कारवाई; सचिवासह दोन सदस्यांना घेतलं ताब्यात

01:58 PM Oct 20, 2022 IST | Abhijeet Khandekar

ऑनलाईन टीम/तरुण भारत

Advertisement

भारतविरोधी कारवाई करणाऱ्या पीएफआय (Popular Front of India) या संघटनेवर बंदी घातल्यानंतर आता पुन्हा महाराष्ट्रात यासंदर्भात एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. पनवेलमधून एटीएसने पीएफआयचे सचिव आणि अन्य दोन सदस्यांना ताब्यात घेतलंय. त्यामुळं मध्यरात्री एकूण चार जणांना एटीएसनं अटक केली असून त्यांची चौकशी केली जात आहे.

भारतात बंदी असतानाही पीएफआयचे काही कार्यकर्ते आपली संघटना पुढे नेण्याचा प्रयत्न करत असल्याच्या आरोपाखाली ही अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही आरोपी पीएफआयच्या एक्स्टेंशन टीमशी संबंधित असल्याचा आरोप आहे.

दहशतवाद्यांना आर्थिक मदत आणि प्रशिक्षण दिल्याच्या आरोपाखाली केंद्र सरकारनं देशभरात एकाचवेळी पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयांवर छापेमारी केली होती. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयानं पीएफआयवर पाच वर्षांची बंदी घातली होती. तरीदेखील काही कार्यकर्ते पीएफआयचा प्रचार व प्रसार करत असल्याची माहिती महाराष्ट्र एटीएसला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारावर एटीएसनं पनवेलमध्ये छापेमारी करत पीएफआयच्या दोन कार्यकर्त्यांना अटक केली. त्यांच्यासह दोन लोकांनाही ताब्यात घेतलं. त्यामुळं आता महाराष्ट्रात एटीएसनं केलेली ही मोठी कारवाई मानली जात आहे.

दरम्यान, पनवेलमध्ये पीएफआय सदस्यांची बैठक झाल्याची गुप्त माहिती महाराष्ट्र एटीएसला मिळाली होती, त्यानंतर एटीएसने ही कारवाई केली. दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र एटीएसने मोठी कारवाई करत मुंबईतून एका दहशतवाद्याला अटक केली होती. चरत सिंग उर्फ ​इंद्रजीत सिंग असे या दहशतवाद्याचे नाव आहे. हा दहशतवादी कॅनडास्थित वॉन्टेड गुन्हेगार लखबीर सिंग लांडा याच्या संपर्कात असल्याचे तपासात उघड झाले आहे.

Advertisement
Tags :
#maharashtra#panvel#pfi
Advertisement
Next Article