महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मळेवाड जिल्हास्तरीय संगीत भजन स्पर्धेत पिंगुळीचे महापुरुष मंडळ प्रथम

03:27 PM Dec 26, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

तर द्वितीय श्री देवी भवानी भजन मंडळ न्हावेली

Advertisement

न्हावेली / वार्ताहर
भजन प्रेमी मित्रमंडळ मळेवाड कोंडुरे आयोजित जिल्हास्तरीय संगीत भजन स्पर्धेत पिंगुळीचे महापुरुष प्रासादिक भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला.द्वितीय क्रमांक न्हावेलीच्या श्री देवी भवानी प्रासादिक भजन मंडळाने तर मातोंड सावंतवाडा येथील श्री देव इसोटी प्रासादिक भजन मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेचा उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे - उकृष्ट गायक अक्षय कांबळी ( श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ,शेर्ले ) व चषक, उकृष्ट हार्मोनियम नीलेश आरोलकर ( श्री देवी सातेरी प्रासादिक भजन मंडळ,सातोळी ) व चषक उकृष्ट पखवाज प्रथमेश राणे ( महापुरुष प्रासादिक भजन मंडळ,पिंगुळी ) व चषक उकृष्ट तबला ओकांर तळवणेकर ) स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ,शेर्ले ) व चषक उकृष्ट झांज शिवराम सावंत ( श्री देव इसोटी प्रासादिक भजन मंडळ,मातोंड सावंतवाडा ) व चषक उकृष्ट कोरस ( श्री देवी माऊली प्रासादिक भजन मंडळ साटेली ) व चषक उकृष्ट राग सादरीकरण प्रसाद आमडोसकर ( महापुरुष प्रासादिक भजन मंडळ,पिंगुळी ) व चषक उकृष्ट शिस्तबद्ध संघ ( श्री दत्तकृपा प्रासादिक भजन मंडळ,वैभववाडी ) व चषक यांची निवड करण्यात आली.स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांना ५००० रुपये ३००० रुपये २००० रुपये तर गायक,हार्मोनियम वादक,तबला,पखवाज,झांजवादक,कोरस,शिस्तबद्ध संघ,राग सादरीकरण प्रत्येकी ५०० रुपयांचे पारितोषिके व चषक देऊन गौरविण्यात आले.स्पर्धेत आठ संघानी सहभाग घेतला होता. परिक्षक म्हणून अमेय गावडे ( पाडलोस ) व वैभव परब ( तुळस ) यांनी काम पाहिले.सूत्रसंचालन प्रविण बर्वे यांनी केली.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat news # nhaveli #
Next Article