Pandharpur : माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते सूर्यनारायणाची महापूजा
नारायण चिंचोलीतील हेमाडपंथी सूर्यनारायण मंदिरात यात्रा उत्सव
पंढरपूर : तालुक्यातील नारायण चिंचोली येथे असणाऱ्या ग्रामदैवत सूर्यनारायण देवाची यात्रा सुरू आहे. पौष महिन्यातील दुसऱ्या रविवारी यात्रेनिमित्त विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते महापूजा झाली.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती अॅड. वामनराव माने, जिल्हा नियोजन समिती सदस्य सुभाष माने, भाजप राज्य कार्यकारणी सदस्य लक्ष्मण धनवडे, दिलीप चव्हाण, भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माऊली हळणवर, संजय घाडगे, तुंगतचे माजी सरपंच आगतराव रणदिवे, ईश्वर बठारचे सरपंच नारायण देशमुख, नारायण चिंचोलीचे उपसरपंच गहिनीनाथ चव्हाण, सूर्यनारायण देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय मस्के, तंटामुक्त अध्यक्ष विजय कोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
नारायण चिंचोली येथे महाराष्ट्रातील एकमेव असे पुरातन हेमाडपंथी मंदिर आहे. येथे पौष महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर यात्रा भरते. यात्रेसाठी संपूर्ण राज्यातून हजारो भाविक येथे येत असतात. यात्रा काळात भाविकांना नारायण देवस्थान ट्रस्ट, ग्रामस्थ व ग्राम प्रशासनाच्यावतीने पुरविल्या जातात.
यावेळी माजी सरपंच बळवंत धनवडे, विठ्ठल माने, ग्रामसेवक संतोष गायकवाड, नितीन मस्के, विष्णू माने, शिवलिंग हिंगमिरे, आप्पासाहेब वाघमोडे, संचालक बापूराव कोले, ज्ञानेश्वर बर्डे, शिवाजी बसेकर, रमेश नाझरकर, मुकुंद घाडगे, पोपट पाटील आदी उपस्थित होते.