राजहंसगडावरील श्री सिद्धेश्वर मंदिरमध्ये महाप्रसाद
10:55 AM Sep 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वार्ताहर/धामणे
Advertisement
राजहंसगडावरील श्री सिद्धेश्वर मंदिरमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे शेवटच्या श्रावण सोमवारनिमित्त महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. बेळगाव परिसरातील पर्यटनस्थळ राजहंसगड गावातील आणि पंचक्रोषीतील भाविकांचे आराध्य दैवत श्री सिद्धेश्वर देवाचा प्रथेप्रमाणे श्रावण मासातील शेवटच्या सोमवारी महाप्रसादाचे वितरण सर्व पंचकमिटीच्यावतीने सोमवारी उत्साहात करण्यात आले. सोमवारी पहाटे 6 ते 8 यावेळेत सिद्धेश्वर देवाला अभिषेक घालण्यात येवून देवाचे विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर आरती करण्यात आली. दुपारी 2 वा. देवाचे पूजन करण्यात येवून दुपारी 1 ते 4 पर्यंत महाप्रसादाचे वाटप झाले. महाप्रसादासाठी शेकडो भाविकांची गर्दी झाली होती. याप्रसंगी पोलिसांचेही सहकार्य चांगले लाभले.
Advertisement
Advertisement