For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Mahapalika Election 2025: नगरसेवक जास्त त्या पक्षाचा महापौर, BJP चा दावा 45 जागांवर

01:36 PM Aug 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
mahapalika election 2025  नगरसेवक जास्त त्या पक्षाचा महापौर  bjp चा दावा 45 जागांवर
Advertisement

महायुतीमधील सर्वच पक्ष महापौर पदावर दावा करत आहेत

Advertisement

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला ठरला आहे. भाजप 45 जागांवर दावा करणार आहे. गतनिवडणुकीत भाजपने जिंकलेल्या 33 जागांव्यतिरिक्त अन्य 12 जागांची मागणी करणार, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच महायुतीमधील सर्वच पक्ष महापौर पदावर दावा करत आहेत. मात्र ज्याचे नगरसेवक जास्त निवडूण येतील त्याच पक्षाचा महापौर होणार, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

महाडिक म्हणाले, महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय होणार असली तरी प्रभागात कोणताही बदल होणार नाही. पूर्वी असलेल्या 81 प्रभागांमधूनच चार प्रभाग जोडून एक प्रभाग होणार आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरु असून अद्याप जाग वाटपाबाबत चर्चा झालेली नाही.  

Advertisement

गतनिवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडीने जिंकलेल्या 33, राष्ट्रवादीच्या 14 आणी शिवसेनेच्या 4 जागा त्याच पक्षांकडे राहणार आहेत. तर काँग्रेसने जिंकलेल्या 29 जागांचे भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये वाटप होईल. 29 जागांपैकी भाजप दहा ते बारा जागा मागणार असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.

विमानतळ आंतरराष्ट्रीय होण्यासाठी सर्व्हे

कोल्हापूर विमानतळाचा सध्या 1930 मी. धावपट्टी कार्यान्वीत करण्याचे काम सुरु आहे. 2300 मी. धावपट्टी वाढविण्याचा प्रस्ताव दिला आहे. यानंतर आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्याबाबातही नागरी उडाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे मागणी केली आहे. कोल्हापूर विमानतळ आंतराष्ट्रीय विमानतळ होऊ शकते का, याचा सर्व्हे करण्याचा आदेश मंत्री मोहळ यांनी दिला आहे.

पाच महिन्यात हा सर्व्हे पूर्ण होईल. यानंतर आंतरराष्ट्रीय विमानतळ होणे शक्य असल्यास आणखी भूसंपादन करावे लागणार आहे. तसेच विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्याच्या प्रस्ताव राज्याने केंद्राकडे पाठवला आहे. असे देशभरातून 60 प्रस्ताव आहेत. प्रस्तावांना कॅबिनेटची मंजुरी मिळाली की नामकरणाचा मार्ग देखील मोकळा होईल असे खासदार महाडिक यांनी सांगितले.

भाजप म्हणूनच निवडणूक लढणार

महापालिका निवडणुकीत आता भाजप म्हणून निवडणूक लढण्यास काही अडचण नाही. गतवेळी काही अडचणी असल्याने ताराराणी आघाडी निवडणुकीत उतरली होती. मात्र यावेळी काही अडचण नसल्याने शत प्रतिक्षत भाजप म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.