महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

महामेळावा होणारच....

06:45 AM Dec 03, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

म. ए. समिती ठाम : पोलिसांनी परवानगी नाकारली; परंतु लेखी पत्र नाही

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी कर्नाटक सरकारकडून प्रतिवर्षी कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बेळगावमध्ये भरविले जाते. याला विरोध म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने महामेळाव्याचे आयोजन 2006 पासून केले जात आहे. यावर्षीही सोमवार दि. 4 रोजी व्हॅक्सिन डेपो मैदान परिसरात महामेळावा होणार आहे. पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली असली तरी महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळाव्यावर ठाम आहे. त्यामुळे सोमवारी बेळगावमध्ये पुन्हा एकदा भगवे वादळ पहायला मिळणार आहे.

बेळगाववर आपला हक्क दाखवून देण्यासाठी कर्नाटक सरकारकडून 2006 पासून बेळगावमध्ये अधिवेशन घेतले जात आहे. अधिवेशनाच्या पहिल्यादिवशी मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करून प्रतिअधिवेशन भरविले जाते. मराठी भाषा आणि संस्कृती टिकविण्यासाठी ध्येयधोरणे ठरविली जातात. पहिल्याच वर्षी झालेल्या महामेळाव्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी उपस्थिती दर्शविली होती. यामुळे सीमावासियांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले होते. परंतु मागील दोन वर्षांपासून महामेळावा होऊ नये यासाठी पोलीस तसेच महानगरपालिका प्रशासनाकडून आडकाठी घातली जात आहे.

यावर्षी कर्नाटक विधिमंडळाचे अधिवेशन सोमवार दि. 4 पासून होणार असल्याने म. ए. समितीने महामेळाव्याची घोषणा केली आहे. 16 नोव्हेंबर रोजी पोलीस आयुक्तांना पत्र देऊन महामेळाव्यासाठी परवानगी मागण्यात आली. या पत्राची दखल घेत शनिवारी म. ए. समितीचे पदाधिकारी व पोलिसांमध्ये बैठक पार पडली. कायदा सुव्यवस्थेचे कारण देत पोलीस प्रशासनाने महामेळाव्याला परवानगी देण्यात येणार नाही, असे स्पष्ट केले. परंतु म. ए. समितीने याला आक्षेप घेत 2006 पासून शांततेने महामेळावा होत असून परवानगी नाकारल्यास हा आमच्या न्यायहक्कांवर घाला असल्याचा घणाघात केला. पोलीस प्रशासनाने परवानगी देणार नसल्याचे सांगितल्याने तसे लेखी द्या, अशी सूचना म. ए. समितीने केली.

पोलीस आयुक्तालयात झालेल्या बैठकीवेळी आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा, कायदा व सुव्यवस्था विभागाचे उपायुक्त रोहन जगदीश, मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमनी, एसीपी अरुणकुमार कोळ्ळूर, खडेबाजार पोलीस स्थानकाचे निरीक्षक दिलीप निंबाळकर त्याचबरोबर म. ए. समितीचे मनोहर किणेकर, मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, विकास कलघटगी, अॅड. एम. जी. पाटील, बी. ओ. यतोजी, गोपाळ देसाई, गोपाळ पाटील, राजाभाऊ पाटील, मुरलीधर पाटील यांसह इतर उपस्थित होते.

व्हॅक्सिन डेपो मैदान परिसरात महामेळावा होणार

पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारल्याने म. ए. समितीची तातडीची बैठक शनिवारी सायंकाळी सह्याद्री सोसायटीच्या सभागृहात पार पडली. पोलीस प्रशासनाने सायंकाळपर्यंत परवानगी नाकारल्याचे पत्र म. ए. समितीकडे पाठविले नसल्याने महामेळावा करण्याचे निश्चित करण्यात आले. सोमवार दि. 4 रोजी सकाळी 11 वाजता व्हॅक्सिन डेपो मैदान परिसरात महामेळावा होणार आहे. जागेची पाहणी करण्यासाठी रविवार दि. 3 रोजी सकाळी 11 वाजता म. ए. समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते जाणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

सायंकाळपर्यंत लेखी उत्तर नाही

महामेळावा भरविणे हा मराठी भाषिकांचा हक्क आहे. परंतु प्रशासनाकडून मराठी भाषिकांना चिरडण्याचा प्रयत्न केला जात आहे. परवानगी न देण्याचे कारण आपण दोन तासांत लेखी स्वरुपात देऊ, असे पोलीस प्रशासनाने सांगितले. परंतु सायंकाळपर्यंत म. ए. समितीकडे पोलिसांचे कोणतेही पत्र आले नसल्याने म. ए. समितीने महामेळावा करण्याचे निश्चित केले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article