For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिनोळी बुद्रुक गावची महालक्ष्मी यात्रा 14 मे पासून

10:45 AM May 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
शिनोळी बुद्रुक गावची महालक्ष्मी यात्रा 14 मे पासून
Advertisement

28 वर्षांनंतर भरणार यात्रा, यात्रेची जोरदार तयारी, भाविकांमध्ये उत्साह

Advertisement

वार्ताहर /उचगाव

बेळगाव-वेंगुर्ले या मार्गावरील कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर वसलेल्या शिनोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथील ग्रामस्थांनी आणि भाविकांनी यावषी 2024 मध्ये लक्ष्मी यात्रा भरवण्याचा संकल्प केला आहे. तब्बल 28 वर्षांनंतर महालक्ष्मी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. 14 मे पासून या यात्रेला प्रारंभ होणार आहे. या यात्रेसाठी अगसगे (ता. बेळगाव) येथून सोमवार दि. 29 एप्रिल रोजी रथाचे साहित्य 14 ट्रॅक्टरमधून आणण्यात आले. यावेळी महालक्ष्मी यात्रा कमिटीचे अध्यक्ष बाबू ज. पाटील तसेच उपाध्यक्ष बाबू ई. पाटील, परशराम पाटील, जोतिबा तानगावडे, माऊती देवण, श्रीपती गुडेकर, नितीन पाटील, विनोद पाटील, प्रा. एन. डी. रेडेकर, यशवंत डागेकर, कृष्णा सुतार, प्रकाश गावडे, जोतिबा पाटील यासह गावातील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 28 वर्षांनंतर या गावची लक्ष्मी यात्रा भरत असल्याने गावात घरोघरी या यात्रेची तयारी जोरदार सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मग घराची दुऊस्ती असेल, नवीन घरांची उभारणी असेल, रंगरंगोटी असेल, अशा विविध कामात येथील ग्रामस्थ गुंतल्याचे चित्र दिसून येत आहे. पै पाहुण्यांचे, मित्रमंडळींचे जोरदार स्वागत झाले पाहिजे, कोणत्याही प्रकारची उणीव भासू नये, यासाठी सर्व ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने या लक्ष्मी यात्रेच्या कामकाजामध्ये मग्न आहेत. यात्रा कमिटीसह ग्रा. पं. तर्फे तयारी करण्यात येत आहे. सरपंच गणपत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामेही गतीने सुरू आहेत. गावातील वीजखांब बदलण्याचे काम सुरू आहे. ग्राम पंचायतच्यावतीनेही गावात येणाऱ्या लक्ष्मी यात्रेसाठी भाविकांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.