महाकुंभ चेंगराचेंगरी : आज सर्वोच्च सुनावणी
जनहित याचिकेची सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
प्रयागराज महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी दाखल जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे. याचिकेत भाविकांच्या सुरक्षेसाठी दिशानिर्देश देणे आणि नियमांचे पालन करविण्याची मागणी करण्यात आाrल आहे. महाकुंभमध्ये 29 जानेवारी रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत कमीतकमी 30 भाविकांना जीव गमवावा लागला होता आणि 60 भाविक जखमी झाले होते.
अधिवक्ते विशाल तिवारी यांच्याकडून महाकुंभ दुर्घटनेसंबंधी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायाधीश संजय कुमार यांचे खंडपीठ सुनावणी करणार आहे. चेंगराचेंगरीच्या घटना रोखणे आणि जीवनाच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
याचिकेत केंद्र आणि सर्व राज्य सरकारांना प्रतिवादी करत महाकुंभमध्ये भाविकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी सामूहिक स्वरुपात काम करण्याचा निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. सर्व राज्यांनी सुरक्षासंबंधी माहिती उपलब्ध करविणे आणि आपत्कालीन स्थितीत स्वत:च्या रहिवाशांच्या सहाय्यासाठी प्रयागराजमध्ये सुविधा केंद्र स्थापन करावे. तसेच भाविकांच्या मदतीसाठी अनेक भाषांमध्ये फलक लावले जावेत आणि घोषणा करण्यात याव्यात. आपत्कालीन स्थितीत केंद्राने कुठल्याही सहाय्यासाठीत यार असावे. तर लोकांना सुरक्षा प्रोटोकॉलविषयी एसएमएस आणि व्हॉट्सअॅपद्वारे माहिती देण्यात यावी, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
व्हीआयपी मूव्हमेंटमुळे भाविकांची सुरक्षा प्रभावित होऊ नये, त्यांच्यासाठी कुठलाही धोका निर्माण होऊ नये आणि महापुंभमध्ये भाविकांसाठी अधिकाधिक जागा उपलब्ध करून देण्याचा निर्देश देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
कायदेशीर कारवाईची मागणी
उत्तरप्रदेश सरकारला 29 जानेवारी रोजी महाकुंभदरम्यान घडलेल्या घटनेवर स्थिती अहवाल सादर करण्याचा आणि निष्काळजीपणा दाखविलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई सुरू करण्याचा निर्देश देण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.