For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जळीतग्रस्त कोळी कुटुंबाला महादेव कोगनुरे यांचा मदतीचा हात; बंकलगी येथे गॅस सिलिंडरच्या स्फोटात झाले होते घर जळून खाक; कोगनुरे यांनी भेट देत केले सांत्वन

03:51 PM Oct 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
जळीतग्रस्त कोळी कुटुंबाला महादेव कोगनुरे यांचा मदतीचा हात  बंकलगी येथे गॅस सिलिंडरच्या स्फोटात झाले होते  घर जळून खाक  कोगनुरे यांनी भेट देत केले सांत्वन
Advertisement
बंकलगी, प्रतिनिधी : अभिजीत जवळकोटे

बंकलगी येथे गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे श्री. बसवराज गोविंद (ढोणज) कोळी यांच्या घराला आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाले. या दुर्घटनेत कोळी कुटुंबाचे मोठे नुकसान झाले असून, त्यांच्यावर संकट ओढवले आहे. घटनेची माहिती मिळताच एम. के. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सागर सिमेंटचे महाराष्ट्र हेड महादेव कोगनुरे यांनी जळीतग्रस्त कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि मदतीचा हात दिला.

Advertisement

एम. के. फाउंडेशनच्या बंकलगी येथील सहकाऱ्यांनी दूरध्वनीद्वारे या दुर्घटनेची माहिती कोगनुरे यांना दिली. त्यानंतर त्यांनी तातडीने कुटुंबाची भेट घेतली. या कठीण प्रसंगी कुटुंबीयांना धीर देत त्यांनी मदतीचा खारीचा वाटा उचलला.

गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे घर जळून खाक झाल्याने कोळी कुटुंबासमोर निवारा आणि दैनंदिन गरजांचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा संकटाच्या काळात समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन मदत करणे महत्त्वाचे आहे. महादेव कोगनुरे यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचे दर्शन घडले.

Advertisement

यावेळी रेवण सिद्ध कोणदे, राजशेखर सगरे, काशप्पा गुरुजी, मंत्रीशे गुरुजी, भाग्यांण्णा दुषवंत, चंदू कोणदे, नागनाथ कोणदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.