For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाबळेश्वर गारठले; वेण्णा तलाव परिसरात हिमकण

04:30 PM Dec 18, 2024 IST | Radhika Patil
महाबळेश्वर गारठले  वेण्णा तलाव परिसरात हिमकण
Mahabaleshwar Garthale; Snowfall in Venna Lake area
Advertisement

महाबळेश्वर : 
महाबळेश्वरमध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला असून पर्यटक या गुलाबी थंडीची मजा लुटत आहेत. मंगळवारी पहाटे येथील प्रसिद्ध वेण्णालेक व लिंगमळा परिसरात दवबिंदूंचे हिमकणांमध्ये रूपांतर झाल्याचे दृश्य पाहावयास मिळाले.

Advertisement

वेण्णालेक-लिंगमळा परिसरात उभ्या असलेल्या वाहनांच्या टपांवर, वेण्णालेकच्या जेट्टीवर हे हिमकण काही प्रमाणात दिसले. शहर व परिसरात थंडीचा जोर वाढला असून या थंडीमुळे निसर्गाची विविध आकर्षक रूपे पाहावयास मिळत आहेत. वेण्णालेक परिसर, लिंगमळा परिसरामध्ये थंडीचा चांगलाच कडाका जाणवत आहे. हवामान खात्याच्या नोंदीनुसार मागील काही दिवसात किमान तापमान 10 अंश ते 12 अंश डिग्री सेल्सियस राहात आहे. सायंकाळी आणखी खाली येत आहे. थंडीच्या कडाक्यामुळे वेण्णा तलाव परिसर चांगलाच गारठला होता. त्यामुळे दवबिंदू गोठून काही भागात हिमकण तयार झाल्याचे फारच सुंदर दृश्य पहावयास मिळाले. वेण्णा तलावावर नौकाविहारासाठी बोटीमध्ये चढउतार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी जेटीवर थोड्या प्रमाणात हिमकण साचल्याचे दिसत होते. तर वाहनांच्या टपांवर मात्र मोठ्या प्रमाणावर हिमकण झाले असल्याचे दृश्य पाहावयास मिळाले.

काही स्थानिकांनी हंगामात पहिल्यांदाच निर्माण झालेले हिमकण पाहण्याचा आनंद घेतला. पर्यटनस्थळी थंडीचा कडाका वाढला असून येथील नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णालेक जेटीसह लिंगमळा परिसरात दवबिंदूचे हिमकणात रूपांतर झाल्याचे दृश्य मंगळवारी सकाळी पाहावयास मिळाले. वेण्णालेक परिसरात मंगळवारी रात्री 4 अंश तापमानाची नोंद झाली असावी तर मंगळवारी पहाटे 4 ते 5 अंश तापमान असल्याची माहिती मिळाली.

Advertisement

महाबळेश्वर शहर व परिसरात गेल्या चार पाच दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. सोमवारी रात्री थंडीत वाढ होऊन मंगळवारी सकाळी वेण्णा लेक परिसरात तापमानाचा पारा भलताच उतरल्यामुळे दवबिंदू गोठून हिमकण तयार झाले होते. महाबळेश्वर शहर व परिसरात थंडीचा जोर वाढला असून या कडाक्याच्या थंडीमुळे निसर्गाची विविध आकर्षक रूपे व सृष्टीसौंदर्य पाहावयास मिळत आहे. वेण्णालेक परिसर, लिंगमळा परिसरामध्ये थंडीचा चांगलाच कडाका जाणवत आहे. मंगळवारी पहाटे वेण्णालेक परिसर धुक्याच्या दुलईत न्हाऊन निघाला होता. या परिसरामध्ये थंडीचे प्रमाण अधिक असल्याने स्थानिकांनी शेकोटीचा आधार घेतल्याचे पाहावयास मिळाले.

येथील प्रसिद्ध वेण्णालेकसह लिंगमळा परिसरामध्ये चारचाकी गाड्यांच्या टपांवर, पानांवर, वेण्णालेकच्या लोखंडी जेटीवर काही प्रमाणातदवबिंदू गोठून हिमकण जमा झाल्याचे चित्र पहावयास मिळाले तर लिंगमळानजीक स्मृतिवन परिसरात तर झाडाझुडपांवर पानांवर हिमकण जमा झाले होते. या परिसरात थंडीचे प्रमाण वेण्णालेकपेक्षा अधिक जाणवत होते. दरम्यान या थंडीच्या हंगामातील हिमकण दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे. थंडी अशीच कायम राहिली तर पुन्हा हिमकण पाहण्याचा अनुभव पर्यटकांना मिळण्याची शक्यता आहे..

Advertisement
Tags :

.