For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News : कोल्हापूरात महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर; पहा कोणाला किती जागा

02:48 PM Jan 22, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur news   कोल्हापूरात महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर  पहा कोणाला किती जागा
Advertisement

                       जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस आघाडीवर; 38 उमेदवारांची यादी जाहीर

Advertisement

कोल्हापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष  काँग्रेसने जिल्हा परिषदेच्या उमेदवारांची यादी बुधवारी जाहीर करुन या निवडणुकीत आघाडी  घेतली आहे. एकूण ६८ जागांपैकी ३८ जागावर काँग्रेसचे उमेदवार आहेत, शिवसेना उबाठा गटाचे ६, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ९, शिवशाहू विकास आपाडीने ४ उमेदवार दिले आहेत, तसेच दोन अपक्षांना कॉग्रेसने पाठिंबा दिला आहे.

या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडे इच्छुकांची भाऊगर्दी झाली होती. महाविकास आघाडी आणि महायुती या दोषांमध्येच खरी लढत होती. जागा कमी आणि इच्छुक जादा यामुळे सर्वच पक्षाच्या नेत्यांपुढे पेच निर्माण झाला होता बंडखोरी उफाळणार याचा सर्वच पक्षांना अंदाज आला होता त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नेत्यांनी उमेदवार यादी जाहीर न करण्याचे गुप्त धोरण अवलंबले होते.

Advertisement

त्यानुसार काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपताच महाविकास आघाडीने जिल्हा परिषदेची आपल्या उमेदवारांची यादी घोषित केली. यात ६८ जागापैकी ५५ जागांवरील उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. उर्वरित जागांबाबत पुढील काही दिवसात निर्णय होण्याची शक्यता आहे. बंडखोरी टाळण्यासाठी महाविकारा आघाडीने अंतिम क्षणी उमेदवारांची नावे घोषित केली असली तरी काही ठिकाणी बहखोरीची ठिणगी पडल्याचे दिसून आले. चंदगडमध्ये त्याचे पहिले पडसाद उमटले असून गोपाळराव पाटील यांनी काँग्रेसची साथ सोडून थेट कमळ हाती घेतले. आणखी काही बंडखोरीच्या मार्गावर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अर्ज माघारीनंतर लढतीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

Advertisement
Tags :

.