महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हरियाणात शेतकऱ्यांची महापंचायत

06:45 AM Sep 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

22 सप्टेंबरला भव्य सभेचे आयोजन : संयुक्त किसान मोर्चाची घोषणा

Advertisement

वृत्तसंस्था/ उचाना

Advertisement

हरियाणातील जिंदमध्ये रविवारी शेतकरी संघटनांनी शेतकरी-मजूर महापंचायत घेतली. बिगरराजकीय संयुक्त किसान मोर्चाचे नेते अभिमन्यू कोहर हे महापंचायतीच्या अध्यक्षस्थानी होते. पंजाबमधील शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल महापंचायतीला उपस्थित होते. याप्रसंगी येत्या रविवारी म्हणजेच 22 सप्टेंबर रोजी भव्य सभा आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली.

हरियाणामध्ये रविवारी शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात जींद जिल्ह्यातील उचाना येथील अतिरिक्त धान्य मार्केटमध्ये महापंचायत पार पडली. या महापंचायतीच्या माध्यमातून शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी भाजप आणि केंद्र सरकारच्या विरोधात रणनीती बनवण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी शनिवारी बैठक घेऊन महापंचायत यशस्वी करण्यासाठी रणनीती आखली होती. शेतकरी, मजूर आणि इतर वर्गातील लोकांना भाजपच्या विरोधात एकवटणे हाच शेतकऱ्यांचा उद्देश आहे.

महापंचायतीत हरियाणा आणि पंजाबमधील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या महापंचायतीपूर्वी पोलिसांनी रात्रीच्या वेळी दाता सिंगवाला सीमेवरील सर्व रस्ते बंद केले होते. त्याचवेळी बॅरिकेड्स लावून कैथलकडून रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला होता. सरकारच्या या भूमिकेवर शेतकरी नेत्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. पोलिसांनी कितीही रस्ते अडवले तरी शेतकरी महापंचायतीपर्यंत नक्कीच पोहोचतील. शेतकऱ्यांचा गट कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही. बळजबरीने शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न झाल्यास शेतकरी तीव्र धरणे आंदोलन करतील, असा इशारा जगजित सिंग डल्लेवाल यांनी दिला आहे.

महापंचायतीसाठी शेतकऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक होते, परंतु अद्याप कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सीमा सील करण्यात आली आहे. कोणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही, असे उचाना पोलीस ठाण्याचे प्रभारी पवन कुमार यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article