For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मॅग्नस कार्लसन विजेता

06:35 AM Jun 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
मॅग्नस कार्लसन विजेता
Advertisement

वृत्तसंस्था/ स्टॅव्हेंगर, नॉर्वे

Advertisement

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसनने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे. असे असले, तरी भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने शेवटच्या फेरीत अमेरिकेच्या हिकारू नाकामुराला पराभूत करून तिसरे स्थान मिळवून आपली मोहीम सकारात्मक पद्धतीने संपवली.

कार्लसनला सुमारे 7 लाख डॉलर्सचे बक्षीस मिळालेले असून या स्पर्धेत 17.5 गुणांची त्याने कमाई केली. प्रत्येक फेरीत एक तर क्लासिकल टाइम कंट्रोलद्वारे किंवा आर्मगेडनद्वारे विजेता ठरेल अशी व्यवस्था या स्पर्धेत करण्यात आली होती. नाकामुरा 15.5 गुणांसह दुसऱ्या स्थानावर, तर प्रज्ञानंद 14.5 गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिला. मात्र प्रज्ञानंदला ही बाब आनंद देऊन जाईल की, त्याने या स्पर्धेत जगातील अव्वल तीन क्रमांकांच्या खेळाडूंना पराभूत केले.

Advertisement

चौथे स्थान फिरोझा अलिरेझाला (13.5 गुण) मिळाले. त्याने चीनचा विश्वविजेता डिंग लिरेनवर आर्मागेडनच्या अंतर्गत विजय मिळवला, लिरेनला तळाकडचे स्थान वाट्याला आले, तर 10 गुणांसह काऊआना पाचव्या स्थानावर राहिला. महिला विभागात वेनजुन जूने अव्वल स्थान मिळविताना 19 गुण मिळवले. अॅना मुझिचूक 16 गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिली आणि टिंगजी लेईपेक्षा 1.5 गुणांनी पुढे राहिली. लेई आर वैशालीपेक्षा दोन गुणांनी पुढे राहिली. 10 गुणांसह कोनेरू हंपी अनुभवी पिया क्रॅमलिंगपेक्षा (8 गुण) पुढे पाचव्या स्थानावर राहिली.

Advertisement
Tags :

.