‘मॅग्नेटा’ आइस्क्रीमच्या ‘मॅग कॅफे’चे थाटात उद्घाटन
शहरात लवकरच सुरू होणार विक्री स्टोअर : शुद्ध दुधाची आइस्क्रीम प्रॉडक्ट
बेळगाव : ‘मॅग्नेटा’ हमारा आइस्क्रीमच्या पहिल्या मॅग कॅफेचे उद्घाटन रविवारी शिवबसवनगर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या समोर झाले. हुक्केरीचे आमदार व उद्योजक निखिल कत्ती यांच्या हस्ते मॅग कॅफेचे उद्घाटन झाले. शुद्ध दुधातील आइस्क्रीम म्हणून अल्पावधीत ओळख झालेल्या मॅग्नेटा या आइस्क्रीम ब्रँडचे लवकरच शहरात स्टोअर सुरू केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आमदार निखिल कत्ती यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक करताना संचालक दिग्विजय सिदनाळ म्हणाले, सध्या बाजारात अनेक फ्रोजन आइस्क्रीम उपलब्ध आहेत. परंतु, नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता शंभर टक्के दुधापासून तयार केलेले आइस्क्रीम मॅग्नेटाने बाजारात आणले.
115 हून अधिक स्वाद (फ्लेवर्स) मध्ये हे आइस्क्रीम उपलब्ध आहेत. सर्वसामान्यांनाही परवडतील अशा दरात चांगल्या दर्जाचे आइस्क्रीम खाण्याची संधी मॅग्नेटाने उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले. आमदार निखिल कत्ती यांनी मॅग कॅफेला शुभेच्छा देत बेळगावमधील नवा ब्रँड आइस्क्रीम क्षेत्रात आला असून स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. सहा महिन्यात या आइस्क्रीमचे अनेक फ्लेवर्स चाखले असून एक उत्तम आइस्क्रीम बेळगावकरांना खाता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मॅग्नेटा आइस्क्रीमचे संचालक शशी सिदनाळ यांनीही आइस्क्रीम का सुरू केले, याची पार्श्वभूमी सांगितली. यावेळी बेळगावमधील बांधकाम व्यावसायिक पी. एस. हिरेमठ, इंद्रजित सिदनाळ, वैभवी सिदनाळ, रवींद्र शेट्टी यांच्यासह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.