For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

होर्मुझमध्ये पहिल्यांदाच ‘मॅग्नेट बॉम्ब’हल्ला

06:07 AM Oct 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
होर्मुझमध्ये पहिल्यांदाच ‘मॅग्नेट बॉम्ब’हल्ला
Advertisement

27 भारतीयांना घेऊन जाणारे जहाज लक्ष्यस्थानी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पश्चिम आशियातील तणाव कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये पुन्हा एकदा एका तेलवाहू जहाजाला लक्ष्य करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पनामा ध्वज असलेल्या ‘एमटी लुईस 1’ या तेलवाहू जहाजावर ‘मॅग्नेट बॉम्ब’द्वारे क्षेपणास्त्राने हल्ला करण्यात आला. यग जहाजावर सत्तावीस भारतीय खलाशी होते. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सरबानंद सोनोवाल यांनी या हल्ल्याला दुजोरा देत जहाजावरील सर्व 27 भारतीय सुरक्षित असल्याचे सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यामुळे इंजिन रूममध्ये आग लागल्यामुळे टँकर तात्पुरता बंद पडला. तथापि, जहाजावरील सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत. 29 ऑक्टोबर रोजी लायबेरियन ध्वजांकित तेलवाहू जहाज व्हीएलसीसी एमटी अर्झानाहला, तर 30 ऑक्टोबर रोजी पनामाच्या ध्वजांकित तेलवाहू जहाज एमटी लुईस 1 ला लक्ष्य करण्यात आले. दोन्ही जहाजांवरील सर्व 29 भारतीय खलाशी सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :

.