मॅजिक स्पोर्टस्, माही, एमव्हीएम, रेग एफसी संघ विजयी
बेळगाव : माजी स्पोर्टस् क्लब आयोजित ग्रासरुट फुटबॉल स्पर्धेत खेळविण्यात आलेल्या सामन्यातून आयबीसिटी, मॅजिक स्पोर्टस्, माही एफसी, एमव्हीएम बी., रेग एफसी संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करुन प्रत्येकी दोन गुण मिळविले. सेंट पॉल्स स्कूलच्या मैदानावर घेण्यात आलेल्या ग्रासरुट फुटबॉल स्पर्धेत पहिल्या सामन्यात आयबीसीटीने एमजेएफए संघाचा 3-1 असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात मॅजिक स्पोर्टस् संघाने एमव्हीएम अ संघाचा 4-1 असा, तिसऱ्या सामन्यात माही एफसीने एमजेएफए संघाचा 3-0, चौथ्या सामन्यात आयबीसीटीने एमव्हीएम अ चा 1-0 असा, पाचव्या सामन्यात मॅजिक स्पोर्टस् अ ने एमव्हीएम बचा 2-0 असा, माही एफसीने मॅजिक स्पोर्टस् 4-0 तर सातव्या सामन्यात एमव्हीएम बने मॅजिक स्पोर्टस् ब चा 1-0 असा निसटता पराभव केला. दुपारच्या सत्रात खेळविण्यात आलेल्या सामन्यात सेंटपॉल अ ला एमव्हीएमने गोलशून्य बरोबरीत रोखले. दुसऱ्या सामन्यात रेग एफसीने सेंट पॉल्स ब चा 2-1 असा, तिसऱ्या सामन्यात सेंट पॉल्स अ ने सेंट पॉल्स ब चा 6-0, चौथ्या सामन्यात मॅजिक स्पोर्टस् अ ने एसजीआयएसचा 3-0 असा पराभव केला तर रेग एफसीला एमव्हीएमने गोलशून्य बरोबरीत रोखले. सहाव्या सामन्यात केएलई अ ने जीवनज्योतीचा 2-0, मॅजिक स्पोर्टस् अ ने केएलई ब चा 6-0 असा पराभव करुन प्रत्येकी दोन गुण मिळविले.