For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शासकीय रेखाकला परीक्षेत माडखोल विद्यालयाचा निकाल १०० टक्के

04:48 PM Jan 17, 2026 IST | अनुजा कुडतरकर
शासकीय रेखाकला परीक्षेत माडखोल विद्यालयाचा निकाल १०० टक्के
Advertisement

ओटवणे : प्रतिनिधी

Advertisement

सन 2025- 26 या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षेचा माडखोल माध्यमिक विद्यालयाचा १०० निकाल टक्के लागला. एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेला या प्रशालेतून बसलेले सर्व ३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात एलिमेंटरी परीक्षेत प्रशालेचे २ विद्यार्थी ए श्रेणीत, २ विद्यार्थी बी श्रेणीत तर २४ विद्यार्थी सी श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. इंटरमिजिएट परीक्षेत या प्रशालेचे ६ विद्यार्थी ए श्रेणीत, २ विद्यार्थी बी श्रेणीत ४ विद्यार्थी सी श्रेणीत उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांना माडखोलचे पोलीस पाटील तथा मूर्तिकार उदय राऊत, आरोंदा हायस्कूलचे कलाशिक्षक चंदन गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री सद्गुरू साटम महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.