For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माडखोल - बामणादेवी एसटी बस सेवा विद्यार्थ्यांसाठी लवकरच

04:12 PM Jun 11, 2026 IST | अनुजा कुडतरकर
माडखोल   बामणादेवी एसटी बस सेवा विद्यार्थ्यांसाठी लवकरच
Advertisement

माडखोल माजी सरपंच संजय लाड यांचा पुढाकार

Advertisement

ओटवणे : प्रतिनिधी
खराब रस्त्यामुळे गेले वर्षभर बंद असलेली माडखोल मुख्य रस्ता ते बामणादेवी ही शालेय एसटी बस लवकरच पूर्ववत सुरू होणार असून त्यादृष्टीने हा रस्ता वाहतुकीस योग्य असल्याचे पत्र प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे उपअभियंता जी. एस. चव्हाण यांनी सावंतवाडी एसटी प्रशासनाला सादर केले आहे.माडखोल गावातील शालेय विद्यार्थ्यांसाठी सावंतवाडी बसस्थानकातून सकाळच्या सत्रात माडखोल- बामणादेवी - धवडकी आणि संध्याकाळच्या सत्रात धवडकी -माडखोल- बामणादेवी अशा दोन बसेस सुरू होत्या. मात्र खराब रस्त्यामुळे या दोन्ही बसेस गेले वर्षभर या बसचा शेवटचा स्टॉप असलेल्या बामणादेवीवाडी पर्यंत जात नव्हत्या. पर्यायाने बामणादेवी वाडीतील विद्यार्थ्यांना गेले वर्षभर माडखोल मुख्य रस्त्यावरून दररोज येता जाता चार किलोमीटर अंतरांची पायपीट करावी लागत होती. पुढील आठवड्यात प्राथमिक माध्यमिक शाळा सुरू होत असून त्या पार्श्वभूमीवर या एसटी बसेस सुरू कराव्यात अशी बामणादेवी वाडीतील पालकांची मागणी होती.त्यामुळे विद्यार्थ्यांची ही गैरसोय लक्षात घेऊन माडखोल माजी सरपंच संजय लाड प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे उपअभियंता जी. एस. चव्हाण यांचे लक्ष वेधल्यानंतर त्यांनी माडखोल मुख्य रस्ता ते बामणादेवीवाडी रस्ता डांबरीकरणचे काम पूर्ण करण्यात आल्याने या रस्त्यावर नियमितपणे एस. टी. वाहतूक पूर्ववत सुरु करण्यास हरकत नाही. असे पत्र सावंतवाडी एसटी प्रशासनास दिले. त्यामुळे लवकरच माडखोल-बामणादेवी - धवडकी ही शालेय बस फेरी एक वर्षानंतर लवकरच पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती माजी सरपंच संजय लाड यांनी दिली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.