For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रणजी स्पर्धेत मध्यप्रदेश उपांत्य फेरीत

06:50 AM Feb 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
रणजी स्पर्धेत मध्यप्रदेश उपांत्य फेरीत
Advertisement

वृत्तसंस्था/ इंदोर

Advertisement

2024 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मध्यप्रदेशने आंध्रचा केवळ 4 धावांनी पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला. या सामन्यात मध्यप्रदेशचा गोलंदाज अनुभव अगरवालने 6 गडी बाद केले. येथील होळकर स्टेडियमवर झालेल्या या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात दोन्ही संघांकडून मोठी धावसंख्या रचली गेली नाही.

या सामन्यात मध्यप्रदेशने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 234 धावा जमविल्या. त्यानंतर आंध्रप्रदेशचा पहिला डाव 172 धावात आटोपला. मध्यप्रदेशने पहिल्या डावात 62 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर मध्यप्रदेशला आंध्रने दुसऱ्या डावात 107 धावात गुंडाळले. त्यामुळे आंध्रला या सामन्यात निर्णायक विजयासाठी 170 धावांची जरूरी होती. पण मध्यप्रदेश संघातील अनुभव अगरवालच्या भेदक गोलंदाजीसमोर आंध्रचा दुसरा डाव 69.2 षटकात 165 धावांत संपुष्टात आल्याने मध्यप्रदेशने केवळ 4 धावांनी आंध्रवर थरारक विजय मिळविला.

Advertisement

2021-22 साली मध्यप्रदेशने रणजी करंडक स्पर्धा जिंकली होती. यावेळी या स्पर्धेत उपांत्यफेरी गाठणारा मध्यप्रदेश हा दुसरा संघ ठरला आहे. तत्पूर्वी तामिळनाडूने या स्पर्धेची उपांत्यफेरी गाठताना कोईमत्तूर येथे झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात विद्यमान विजेत्या सौराष्ट्रचा 4 गड्यांनी पराभव केला होता. आंध्रने 4 बाद 95 या धावसंख्येवरून सोमवारी खेळाला पुढे सुरूवात केली. त्यांना विजयासाठी आणखी 75 धावांची जरूरी होती. पण अगरवालच्या अचूक गोलंदाजीसमोर आंध्रचे फलंदाज अधिक प्रतिकार करू शकले नाहीत. अनुभव अगरवालने आंध्रप्रदेशच्या पहिल्या डावात 3 गडी बाद केल्याने मध्यप्रदेशला 62 धावांची आघाडी मिळविता आली. आंध्रच्या दुसऱ्या डावात अगरवालने 52 धावात 6 गडी बाद केले. त्याने या सामन्यात एकूण 9 बळी मिळविले. मध्यप्रदेशतर्फे कुलवंत खजोरलियाने 2 तर कुमार कार्तिकेय व सारांश जैन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. आंध्रच्या हनुमा विहारीने 5 चौकारांसह 55 धावा जमविल्या. गिरीनाथ रे•ाrने 15 तर अश्विन हेब्बारने 22 धावा केल्या. या सामन्यात अनुभव अगरवालला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

संक्षिप्त धावफलक - मध्यप्रदेश प. डाव 234, आंध्र प. डाव 172, मध्यप्रदेश दु. डाव 107, आंध्र दु. डाव 69.2 षटकात सर्वबाद 165 (हनुमा विहारी 55, हेब्बार 22, रे•ाr 15, अनुभव अगरवाल 6-52).

Advertisement
Tags :

.