For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मध्यप्रदेशला 174 धावांची आघाडी

06:02 AM Jan 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
मध्यप्रदेशला 174 धावांची आघाडी
Advertisement

वृत्तसंस्था / इंदौर

Advertisement

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील येथे इलाईट ब गटातील सुरू असलेल्या सामन्यात शुक्रवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर मध्यप्रदेशने महाराष्ट्रावर 174 धावांची आघाडी मिळविली आहे.

या सामन्यात मध्यप्रदेशचा पहिला डाव 187 धावांवर आटोपल्यानंतर महाराष्ट्राला पहिल्या डावात केवळ 179 धावा जमविता आल्या. या सामन्यामध्ये खेळाच्या दोन दिवसांत गोलंदाजांनी दर्जेदार कामगिरी केली. खेळाच्या पहिल्या दिवशी गोलंदाजांनी 12 गडी बाद केले तर शुक्रवारी दुसऱ्या दिवशी गोलंदाजांनी पुन्हा 12 बळी मिळविले. महाराष्ट्राने 2 बाद 52 या धावसंख्येवरुन दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. त्यांचा पहिला डाव 54.3 षटकांत 179 धावांत आटोपला. ऋतुराज गायकवाडने 1 षटकार, 4 चौकारांसह 46, नवलेने 3 चौकारांसह 29, निरज जोशीने 5 चौकारांसह 29, अर्शिन कुलकर्णीने 5 चौकारांसह 27 तर शॉने 3 चौकारांसह 14 धावा जमविल्या. मध्यप्रदेश संघातील गोलंदाज कुमार कार्तिकेयने 33 धावांत 6 गडी बाद केले. सारांश जैनने 2 तर सेन आणि सोळंकी यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला. मध्यप्रदेशने महाराष्ट्राने पहिल्या डावात 8 धावांची आघाडी मिळविली.

Advertisement

मध्यप्रदेशने दुसऱ्या डावात 47 षटकांत 4 बाद 166 धावा जमविल्या. यश दुबे आणि हिमांशु मंत्री ही सलामीची जोडी केवळ 29 धावांत बाद झाल्यानंतर शुभम शर्मा आणि व्यंकटेश अय्यर यांनी तिसऱ्या गड्यासाठी 102 धावांची शतकी भागिदारी केली. शर्मा 6 चौकारांसह 55 धावांवर खेळत आहे. व्यंकटेश अय्यरने 9 चौकारांसह 60 धावा केल्या. यश दुबेने 12 तर मंत्रीने 16 धावा जमविल्या. कर्णधार रजत पाटीदार 11 धावांवर बाद झाला. महाराष्ट्रातर्फे घोषने 2 तर सक्सेनाने 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक: मध्यप्रदेश प. डाव 187, महाराष्ट्र प. डाव 179 (गायकवाड 46, जोशी 29, नवले 29, कुलकर्णी 27, अवांतर 20, कार्तिकेय 6-33, जैन 2-53), मध्यप्रदेश दु. डाव 4 बाद 166 (शुभम शर्मा खेळत आहे 55, व्यंकटेश अय्यर 60, यश दुबे 12, मंत्री 16, पाटीदार 11, सोळंकी खेळत आहे 10, घोष 2-52, सक्सेना 1-52).

Advertisement
Tags :

.