महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोल्हापूर उत्तरमधून मधुरिमा राजे छत्रपती यांची माघार

04:11 PM Nov 04, 2024 IST | Radhika Patil
Madhurima Raje Chhatrapati withdraws from Kolhapur North
Advertisement

कोल्हापूर :
कोल्हापूर उत्तर मतदारसंघाला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. आज (सोमवार) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अखेरचा दिवस होता. काँग्रेसनं उमेदवारी दिलेल्या मधुरिमाराजे छत्रपती यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला आहे. राजेश लाटकर यांनी कोल्हापूर उत्तरमध्ये अपक्ष अर्ज भरला होता.

Advertisement

त्यानंतर मधुरिमाराजे छत्रपती यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.त्यामुळे लाटकर नाराज झाले होते. गेल्या काही दिवसांपासून राजेश लाटकर यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू होते. आज सकाळपासून ते नॉटरिचेबल होते दरम्यान आज अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दहा मिनिटात खासदार शाहू महाराज, युवराज मालोजीराजे छत्रपती व मधुरिमाराजे छत्रपती यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. राजेश लाटकर यांनी माघार घेतली नाही,ते चांगले कार्यकर्ते आहेत, त्यामुळे आम्ही ठरवलं की अशा परिस्थितीत निवडणूक लढायचं नाही, असे खासदार शाहू महाराज यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article