For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माधुरी पाटीलचे विविध क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

10:12 AM Jan 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
माधुरी पाटीलचे विविध क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश
Advertisement

कंग्राळी बुद्रुक : कंग्राळी बुद्रुक गावची कन्या व मराठी प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी माधुरी गजानन पाटीलने राष्ट्रीय आंतर जिल्हा ज्युनियर अॅथलेटिक स्पर्धेत उंच उडी, लांब उडी व 60 मीटर धावणे या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. या यशाबद्दल माधुरीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. सदर स्पर्धा 5 जानेवारी रोजी बेळगाव येथील जिल्हा क्रीडांगणावर पार पडल्या. या स्पर्धेमध्ये माधुरीने वरील प्रमाणे यश संपादन केले आहे. वरील यशासाठी शाळेचे क्रीडाशिक्षक ए. एच. बेपारी यांचे मार्गदर्शन तर शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षाकांचेही प्रोत्साहन लाभत आहे. माधुरीने विविध स्पर्धांमध्ये आपल्या कामगिरीत सातत्य राखले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.