For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोल्हापूर जिल्हा संपर्क मंत्री पदी माधुरी मिसाळ

12:37 PM Feb 05, 2025 IST | Pooja Marathe
कोल्हापूर जिल्हा संपर्क मंत्री पदी माधुरी मिसाळ
Advertisement

पालकमंत्री नसलेल्या जिह्यात भाजपकडून संपर्क मंत्र्यांच्या नियुक्ती
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत केली नावांची घोषणा
मुंबई
भाजपकडून कोल्हापूर जिल्ह्याच्या संपर्क मंत्रीपदी राज्य नगर विकास मंत्री तथा कोल्हापूरच्या सह पालकमंत्री माधुरी मिसाळ यांची नेमणूक करण्यात आली. प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संपर्क मंत्र्यांच्या नावांची घोषणा केली.
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्र्यांच्या नेमणुका करण्यात आल्या. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी शिवसेना शिंदे गटाचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची नियुक्ती झाली. तर सह पालकमंत्री पदी राज्य नगर विकास मंत्री माधुरी मिसाळ यांची नियुक्ती झाली. मंगळवारी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक झाली. यामध्ये ज्या जिल्ह्यात भाजपचे पालकमंत्री नाहीत अशा जिल्ह्यात भाजपकडून संपर्क मंत्र्यांची नेमणूक करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीच्या पदाधिक्रायांची कामे व्हावीत त्यांना कुठली अडचण येऊ नये यासाठी तसेच नागरिकांचे प्रश्न सुलभपणे सोडवले जावेत या उद्देशाने संपर्क मंत्री पदाच्या नियुक्त करण्यात आल्या आहेत.
माधुरी मिसाळ यांच्यासह पंकजा मुंडे - बीड, शिवेंद्रसिंहराजे भोसले -सातारा, गणेश नाईक - ठाणे, अतुल सावे - संभाजीनगर,चंद्रकांत पाटील - पुणे, आशिष शेलार -रत्नागिरी,गिरीश महाजन - जळगाव,जयकुमार रावल - नंदुरबार, मंगलप्रभात लोढा - मुंबई शहर, अशोक उईके - यवतमाळ, जयकुमार गोरे - धाराशिव, मेघना बोर्डीकर - हिंगोली, आकाश फुंडकर - बुलढाणा, पंकज भोयर - गोंदिया आणि राधाकृष्ण विखे पाटील यांची वाशिम च्या संपर्क मंत्रीपदी नेमणूक करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.