‘मिसेज देशपांडे’ चित्रपटामध्ये माधुरी दीक्षित
ओटीटीवर होणार प्रदर्शित
अभिनेत्री माधुरी दीक्षित स्वत:चा आगामी चित्रपट ‘मिसेज देशपांडे’मधून एका नव्या अवतारासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या रोमांचक थ्रिलरपटाला 19 डिसेंबर रोजी प्रदर्शित केले जाणार आहे. नागेश कुकुनूर यांच्याकडून दिग्दर्शित या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
याच्या प्रीह्यूत माधुरी अत्यंत साध्या आणि ग्लॅमरस अवतारात दिसून येत आहे. ती शांतपणे भाज्या चिरताना आणि चित्रपटाचे गाणे गुणगुणताना दिसून येते, तर एका रेडियो बुलेटिनमध्ये एका सीरियल किलरविषयी सांगण्यात येत असल्याचे यात दिसून येते.
कुकुनूर मूव्हीजच्या सहकार्याने अप्लॉज एंटरटेन्मेंटकडून निर्मित हा चित्रपट फ्रेंच थ्रिलर ‘ला मोन्ते’चे हिंदी वर्जन आहे. माधुरीसोबत या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर आणि प्रियांशु चटर्जी हे कलाकारही मुख्य भूमिकेत आहेत.
मिसेज देशपांडे माझ्यासाठी खरोखरच एक मनोरंजक प्रवास राहिला आहे. कहाणीवर काम सुरू असताना मी मुख्य भूमिकेत केवळ माधुरीलाच पाहिले होते आणि तिला या अवघड भूमिकेला साकारताना पाहणे माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब होती असे दिग्दर्शन कुकुनूर यांनी म्हटले आहे. मिसेज देशपांडे हा मी यापूर्वी केलेल्या कुठल्याही चित्रपटापेक्षा वेगळा असल्याचे माधुरीने म्हटले आहे. तर मिसेज देशपांडे हा चित्रपट 19 डिसेंबरपासून जियो हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे.