प्रकाशराव जमदाडे यांच्या प्रयत्नाला यश, माडग्याळला रविवारपासून मिळणार पाणी!
जत प्रतिनिधी
जत तालुक्यातील माडग्याळ परिसराला म्हैसाळ योजनेचे पाणी मिळावे यासाठी सुरू असणाऱ्या संघर्षाला अखेर यश आले आहे. जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांच्या अथक परिश्रमामुळे अतिरिक्त कॅनॉलचे खुदाई पूर्ण झाली असून, रविवारी या भागात म्हैसाळ योजनेचे पाणी येणार आहे.
पाटबंधारे विभागाने रविवार दि.१७ रोजी म्हैशाळ योजनेचे पाणी माडग्याळ ओढ्यात सोडण्याचे नियोजन केले आहे. याचे पुजन लोकप्रिय खासदार संजयकाका पाटील व माजी आमदार विलाराव जगताप साहेब, जलसंपदा विभागाचे अधिकारी, माडग्याळ व परिसरातील सर्व शेतकरी यांचे हस्ते संपन्न होणार आहे.
म्हैशाळ योजनेचा कॅनाल माडग्याळ गावचे शिवे वरून गेला आहे. गेल्या वर्षापासन उमदी व मंगळवेढ्यापर्यंत पाणी गेले आहे. पंरतु माडग्याळला पाणी नव्हते. त्यामुळे शेतकरी वांरवार मागणी करीत होते, या प्रशनी प्रकाशराव जमदाडे यांनी मार्च २०२० पासून प्रयत्न सुरु केले होते. खा. संजय काकाची भेट घेऊन माडग्याळ ओढ्यात पाणी सोडल्यास माडग्याळ सोन्याळ, कुलाळवाडी, उटगी या भागातील शेतक-यांना लाभ होणार आहे. तसेच सायफन पद्धतीने दोडुनाला मध्यम प्रकल्प भरला जाणार आहे, ही ही बाब संजय काका व पाटबंधारे विभागाला पटवून दिली.
तसेच याचा फायदा त्यामुळे उमदी, हळ्ळी, निगडी बु. इ. गावाना होणार आहे. यावर तातडीने दुस-याच दिवशी तत्कालीनअभियंता मासाळ साहेब यांनी पाहणी केली. त्यावेळी पासुन या कामाचा सतत पाठपुरावा सुरु होता. जुलै २०२३ मध्ये जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागाच्या मशिनरीने काम चालु केले. पंरतु वनविभागाने परवानगी नाही म्हणुन काम बंद पाडले. त्यामुळे अक्षरशा शेतकरी ठसाठसा धाय मोकलून रडले होते.नंतर शेतक-यांच्या संमतीने ऑगस्टमध्ये काम चालू केले. आता हे काम पूर्ण झाले असून रविवारी पाणी सोडण्यात येणार आहे, हा दिवस माडग्याळकरासाठी सुवर्णकंक्षमध्ये लिहला जाईल, अशी माहिती प्रकाशराव जमदाडे यांनी दिली.
या कामास पाटबंधारे विभागाचे कार्याकारी अधिकारी सचिन पवार साहेब व सर्व अधिकारी यांचे मोलाचे योगदान मिळाले . त्याचबरोबर विठ्ठल निकम, लिबंजी कोरे, सरपंच महादेव माळी, प्रमोद सावंत सुखदेव माळी, परशराम बंडगर ग्रामपंचायत सर्व सदस्य शेतकरी यांचे मोठे योगदान लाभले आहे.