महाराष्ट्र | कोकणकोल्हापूरअहमदनगरमुंबई /पुणेसांगलीसातारासोलापूर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मडगावचा प्रसिद्ध दिंडी महोत्सव आज

12:21 PM Nov 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

Advertisement

मडगाव : महाराष्ट्रातील वारकरी परंपरेशी नाते सांगणारा मडगाव प्रसिद्ध दिंडी उत्सव आज शनिवार दि. 25 रोजी साजरा करण्यात येत असून या उत्सवात अनेक संस्थांनी विविधरंगी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. संपदा कदम माने (मुंबई) व सौरभ काडगांवकर (पुणे) यांचे गायन यंदाच्या दिंडी उत्सवाचे मुख्य आकर्षण असेल. हरि  मंदिर मंडपात 26 रोजी सुप्रसिद्ध गायिका सुस्मिता डवाळकर, मुंबई यांच्या गायनाने दिंडी महोत्सवाची सांगता होईल. दिग्गज गायकांच्या मैफलीसह दिंडी पथक स्पर्धा, रांगोळी, पणती आरास, आकाशकंदील, फळे कोरण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या उत्सवात कोब विठ्ठल मंदिरासह, दामबाबाले घोडे, सॉलीड पार्टी ट्रस्ट व युव संजीवन आदी संस्थांचा सहभाग आहे. संपदा कदम माने (मुंबई) व सौरभ काडगावकर (पुणे) यांची पहिली बैठक संध्याकाळी 6.30 वाजता हरि मंदिराजवळच्या व्यासपीठावर होणार आहे. न्यू मार्केट येथील युको बँकेसमोरच्या व्यासपीठावर दुसरी व पालिका चौकात रात्री 11 वाजता तिसरी बैठक होणार आहे. याला जोडूनच श्री दामबाबाले घोडे सांस्कृतिक मंडळतर्फे दिंडी पथक स्पर्धा आयोजित केली आहे. यंदाच्या स्पर्धेत किमान 25 पथके सहभागी होणार आहे. या दिंडी पथकाच्या सादरीकरणाने मडगावच्या दिंडी महोत्सवाला खऱ्या अर्थाने रंग भरतो. त्याच बरोबर त्यांची आकाशकंदील स्पर्धा ही खास असते.

Advertisement

सॉलीड पार्टीतर्फे रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले जात असून त्यालाही उत्स्फूर्त  असा प्रतिसाद मिळत असतो. गोव्याच्या विविध भागातून येणारे कलाकार अप्रतिम रांगोळीचे सादरीकरण करत असतात.  युव संजीवनी संस्थेने कोंब येथे रात्री 10 वाजता ‘स्वर दिंडी’ हा हिंदी, मराठी, कोकणी गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. आज शनिवार दि. 25 रोजी मुख्य दिंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. या दिवशी सकाळी 7 वा. श्रींस महाअभिषेक व इतर धार्मिक कार्यक्रम. सकाळी 10 वा. सुरेंद्र शेणवी बोरकर (बोरी) व साथीकलाकारांचा भजनाचा कार्यक्रम होईल. दुपारी 12.30 वा. महाआरती तद्नंतर महाप्रसाद (अन्नसंतर्पण). सायंकाळी 5 वा. गोमंतकाबाहेरील वारकरी संप्रदायांतर्फे भजनाचा कार्यक्रम, सायंकाळी 6.15 वा. श्री माऊलीची धार्मिक ग्रंथासह श्रींच्या रथात स्थापना होईल. रात्री 8 वा. सुप्रसिद्ध दिंडी आयोजक बाबू गडेकर संचालित श्री दामोदर बोगदेश्वर दिंडी पथक, वास्को आणि निमंत्रित वारकरी भजनी मंडळासह श्री विठ्ठल रखुमाई रथाचे श्री हरिमंदिर येथून प्रस्थान होईल.  रात्री 11 वा. नगरपालिका चौकात प्रमुख गायक व वादक कलाकारांची तिसरी गायनी बैठक झाल्यानंतर श्रींच्या दिंडी रथाचे श्री राम मंदिर, श्री दामोदर साल व श्री विठ्ठल मंदिर येथे प्रस्थान. रविवार दि. 26 रोजी दुपारी 12.30 वा. श्रींच्या दिंडी रथाचे श्री हरिमंदिरात आगमन व तद्नंतर ‘गोपाळकाला’, महाआरती. रात्री 8 वा. सुप्रसिद्ध गायिका सुस्मिता डवाळकर, मुंबई यांच्या गायनाने दिंडी महोत्सवाची सांगता होईल.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article