For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘मेड इन इंडिया-ए टायटन स्टोरी’चे होतेय कौतुक

06:06 AM Jun 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘मेड इन इंडिया ए टायटन स्टोरी’चे होतेय कौतुक
Advertisement

भारताच्या मोठ्या उद्योगाची कहाणी

Advertisement

अमेजॉन एमएक्स प्लेयरने स्वत:ची आगामी सीरिज ‘मेड इन इंडिया-ए टायटन स्टोरी“चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. ही सीरिज भारताच्या सर्वात प्रतिष्ठित ब्रँडपैकी एका ब्रँडची असाधारण कहाणी दर्शविणार आहे. विनय कामत यांचे पुस्तक ‘टायटन-इंडियाज मोस्ट सक्सेसफुल कंझ्यूमर ब्रँड‘वर आधारित सीरिजमध्ये जेआरडी टाटांच्या भूमिकेत नसीरुद्दीन शाह, जेरक्सेस देसाईंच्या भूमिकेत जिम सर्भ  दिसून येणार आहे. सीरिजमध्ये वैभव तत्ववादी, नमिता दुबे, लक्षवीर सरन आणि कावेरी सेठ हे कलाकारही मुख्य भूमिकेत आहेत.

ही सीरिज मेक इन इंडिया पुढाकाराच्या भावनेसोबत प्रतिध्वनित होते. करण व्यासकडून लिखित, रॉबी ग्रेवालकडून दिग्दर्शित ही सीरिज महत्त्वाकांक्षा, मार्गदर्शन आणि उत्कृष्टतेच्या अथक शोधाची पडताळणी करते, ज्याने एक अनपेक्षित विचाराला राष्ट्रीय वारशात रुपांतरित केले.

Advertisement

एक भारतीय घड्याळ ब्रँड निर्माण करण्याचा साहसी विचार हळूहळु एका अत्यंत मोठ्या स्वप्नात बदलतो, जसजसा विरोध वाढतो आणि अनिश्चिततेचे वातावरण गडद होते, जेरक्स देसाई आणि जेआरडी टाटा हे भारत स्वत:च्या बळावर काही निर्माण करू शकतो या विश्वासावर ठाम राहतात. ‘मेड इन इंडिया-ए टायटन स्टोरी“ सीरिज 3 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. अमेझॉन एमएक्स प्लेयरवर ती मोफत पाहता येणार आहे.

Advertisement
Tags :

.