For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मॅक्रॉन 2027 नंतर राजकारण सोडणार

06:44 AM Apr 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
मॅक्रॉन 2027 नंतर राजकारण सोडणार
Advertisement

निवृत्तीची घोषणा ; फ्रेंच राजकारणात ‘महाभूकंप’

Advertisement

वृत्तसंस्था/ सायप्रस

फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आपल्या राजकीय भवितव्याबद्दल एक मोठा खुलासा करत निवृत्तीची घोषणा केली आहे. सायप्रस दौऱ्यावर असताना निकोसियामधील विद्यार्थ्यांशी बोलताना मॅक्रॉन यांनी आपण 2027 मध्ये आपला दुसरा आणि अंतिम कार्यकाळ संपल्यानंतर राजकारणातून पूर्णपणे निवृत्त होणार असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या घोषणेने फ्रान्सच्या राजकीय पटलावर ‘महाभूकंप’ झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Advertisement

राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी आपण राजकारणात सक्रिय नव्हतो आणि आपला कार्यकाळ संपल्यानंतरही राजकारणात सक्रिय राहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी तूर्तास आपल्या भविष्यातील नेमक्या योजना उघड केल्या नसल्या तरी, ते सक्रिय राजकारणातून दूर होऊन खासगी जीवन किंवा इतर कामांमध्ये लक्ष घालतील असे दिसत आहेत.

मॅक्रॉन यांचा राजकीय उदय फ्रेंच इतिहासात उल्लेखनीय ठरला आहे. 1958 मध्ये पाचव्या प्रजासत्ताकाच्या स्थापनेनंतरचे सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष म्हणून ते 2017 मध्ये वयाच्या 39 व्या वर्षी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष बनले. 2022 मध्ये ते पुन्हा निवडून आले असले तरी, फ्रेंच राज्यघटनेनुसार त्यांना सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्यास मनाई आहे. अध्यक्ष होण्यापूर्वी त्यांनी 2014 ते 2016 या काळात फ्रान्स्वा ओलांद यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून काम केले.

Advertisement
Tags :

.