मॅकेन्टोशचे दोन विश्वविक्रम
वृत्तसंस्था / व्हिक्टोरिया (कॅनडा)
कॅनडाची महिला जलतरणपटू समर मॅकेन्टोशने गेल्या तीन दिवसांमध्ये जलतरणात दोन विश्वविक्रम नोंदविले. टोरँटोच्या 18 वर्षीय मॅकेन्टोशने गेल्या वर्षी झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत तीन सुवर्णपदके मिळविली होती.
महिलांच्या 200 मी. वैयक्तिक मिडले जलतरण प्रकारात मॅकेन्टोशने नवा विश्वविक्रम नोंदविताना 2 मिनिटे, 5.7 सेकंदांचा अवधी घेताना 2015 साली हंगेरीच्या होसेझूने नोंदविलेला 2 मिनिटे 06.12 सेकंदांचा विश्वविक्रम मोडीत काढला. गेल्या शनिवारी मॅकेन्टोशने महिलांच्या 400 मी. फ्रिस्टाईल प्रकारात 3 मिनिटे 54.18 सेकंदांचा अवधी घेत नवा विश्वविक्रम करताना ऑस्ट्रेलियाच्या टिटमसने नोंदविलेला 3 मिनिटे 55.38 सेकंदांचा विश्वविक्रम मागे टाकला होता. गेल्या रविवारी मॅकेन्टोशने महिलांच्या 800 मी. फ्रिस्टाईल प्रकारातील स्वत:चाच विक्रम मागे टाकला.