For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जुने बेळगाव, वडगाव, शहापूर शिवारात मशीनने ऊस तोडणीला सुरुवात

10:49 AM Jan 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
जुने बेळगाव  वडगाव  शहापूर शिवारात मशीनने ऊस तोडणीला सुरुवात
Advertisement

विलंब झाल्याने शेतकऱ्यांचे होतेय नुकसान

Advertisement

बेळगाव : ऊसतोड कामगारांची यावर्षी संख्या कमी असल्यामुळे बेळगाव शहर परिसरातील  शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. ऊस परिपक्व झाल्यामुळे आता रस गोठू लागला आहे. तरी ऊसतोडणी होत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी जुने बेळगाव, वडगाव व शहापूर शिवारातील शेतकऱ्यांना उसतोड मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. वडगाव कृषी पत्तीन सोसायटीचे संचालक संतोष शिवनगेकर यांनी यासाठी मेहनत घेतली आहे.

दरवर्षी ऊसतोड कामगारांची संख्या कमी होत असल्याने ऊसतोडणीचा कालावधी वाढत आहे. वडगाव, शहापूर व जुने बेळगाव शिवारात अल्पभूधारक शेतकरी असल्यामुळे ऊसतोड मशीन बांधापर्यंत आणणे परवडणारे नव्हते. परंतु आता ऊस परिपक्व झाला असून, त्याला तुरे येऊ लागले आहेत. त्यामुळे उसातील रस गोठण्यास सुरुवात झाली आहे. अजून काही दिवस ऊस शेतात राहिला तर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.

Advertisement

संतोष शिवनगेकर यांनी चंदगड येथील शेतकऱ्यांशी संपर्क साधून ऊसतोड मशीन मागवून घेतली. यासाठी त्यांना बरेच प्रयत्न करावे लागले. मागील पाच ते सहा दिवसांपासून या परिसरातील ऊसतोडणीच्या कामाला सुरुवात झाली असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. यानिमित्ताने शेतकऱ्यांमधून संतोष शिवनगेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पांडुरंग बाळेकुंद्री, तानाजी हलगेकर, आनंद कणबरकर, सुशांत कुसाणे, भोमेश बिर्जे, पिंटू कुगजी, प्रमोद धामणेकर, सिद्राय वाळके, सतीश पाटील उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.