For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मॅकबुक एअर विक्रीसाठी उपलब्ध

06:07 AM Mar 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
मॅकबुक एअर विक्रीसाठी उपलब्ध
Advertisement

2 टीबी स्टोरेजसह 18 तास चालणाऱ्या बॅटरीची सुविधा : किमत 1.14 लाखापासून सुरु

Advertisement

वृत्तसंस्था/  नवी दिल्ली

तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी अॅपल यांनी भारतात नवीन एम3 चिप असलेले अॅपल मॅक बुक एअर दोन नवीन लॅपटॉप सादर केले आहेत. हे 13 आणि 15इंच इतक्या आकाराच्या स्क्रीनच्या दोन पर्यायांसह सादर केले गेले आहेत. कंपनीने दावा केला आहे, की यामध्ये 2 टीबी पर्यंत स्टोरेज आणि 18 तासांपर्यंत चालणारी बॅटरी उपलब्ध होणार असल्याची माहिती दिली आहे.

Advertisement

13 इंच मॉडेलची सुरुवातीची किमत ही 1,14,900 रुपये ठेवली आहे. तर 15 इंच असणाऱ्या मॉडेलची किंमत ही 1,34,900 रुपये राहणार आहे. या लॅपटॉपची विक्री ही 8 मार्चपासून सुरु असून अधिकृत वेबसाईट आणि स्टोअरवर विक्री राहणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. यासोबतच अॅपलच्या अधिकृत विक्रेत्यांकडे हे मॉडेल उपलब्ध होणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

जुन्या आवृत्ती एम1 पेक्षाही वेगवान

यावेळी ग्रेग जोसविक म्हणाले, की  मॅकबुक एअर हा आमचा सर्वात लोकप्रिय मॅक आहे. जो इतर कोणत्याही लॅपटॉपेक्षा ग्राहाकांची अधिकची पसंती आहे. अॅपल ची एम3 चिप आणि नवीन क्षमता ही अधिक चांगली असल्याचे स्पष्ट केले आहे.

Advertisement
Tags :

.