For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एम थ्री एम समूह 10 हजार कोटीची करणार गुंतवणूक

07:00 AM Jul 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
एम थ्री एम समूह 10 हजार कोटीची करणार गुंतवणूक
Advertisement

बेंगळूरु : बांधकाम क्षेत्रातील कंपनी एम थ्री एम या आर्थिक वर्षात 10 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक जागा खरेदी व बांधकाम निर्मितीसाठी वापरली जाणार आहे. गुरुग्राममधील एमथ्रीएम समूहाच्या एमथ्रीएम इंडिया व स्मार्टवर्ल्ड डेव्हलपर्स या दोन कंपन्या बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहेत. कंपनी रहिवासी, व्यावसायिक व मिश्र प्रकल्पांची उभारणी उत्तर भारतात करते. सध्याला कंपनीच्या ताब्यात 30दशलक्ष चौ. फू. इतकी जागा बांधकामाआधीन आहे. चालू आर्थिक वर्षात कंपनी 7200 कोटी रुपयांची गुंतवणूक पूर्णपणे बांधकाम प्रक्रियांसाठी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. एकट्या गुरुग्राममध्ये कंपनीने 500 एकरची जागा ताब्यात घेतली आहे. जवळपासच्या भागात जागा घेतली असून त्याकरीता 2500 कोटी रुपयांची गुंतवणूक कंपनीने केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.