For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एम. फिल. पदवीला मान्यता नाही!

06:41 AM Dec 28, 2023 IST | Tarun Bharat Portal
एम  फिल  पदवीला मान्यता नाही
Advertisement

विद्यापीठ अनुदान आयोगाचे स्पष्टीकरण

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

एम. फिल. (मास्टर ऑफ फिलॉसॉफी) ही पदवी मान्यताप्राप्त नाही, असे स्पष्टीकरण विद्यापीठ अनुदान आयोगाने केले आहे. तसेच एम. फिल. अभ्यासक्रम चालविणाऱ्या विद्यापीठांना यासंबंधी इशाराही दिला आहे. विद्यार्थ्यांनी अशा अभ्याक्रमांसाठी प्रवेश घेऊ नये, अशी सूचना आयोगाने केली आहे.

Advertisement

काही विद्यापीठांनी मास्टर ऑफ फिलॉसॉफी या शिक्षणक्रमासाठी विद्यार्थ्यांकडून आवेदनपत्रे मागविली आहेत, ही बाब आयोगाच्या ध्यानात आली आहे. या सर्व विद्यापीठांना आणि अशा अभ्यासक्रमासाठी स्वत:ची नावे नोंदविणाऱ्या विद्यार्थ्यांनाही असा इशारा देण्यात येत आहे, की एम. फिल. अभ्यासक्रम मान्यताप्राप्त नाही. त्यामुळे नावे नोंदवू नयेत. तसेच विद्यापीठांनी या अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया त्वरित थांबवावी. कोणत्याही एम. फिल. अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये, अशी स्पष्टोक्ती बुधवारी एका निवेदनाद्वारे आयोगाने केली आहे.

Advertisement
Tags :

.