कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महामार्गावर आराम बसला भीषण आग

03:47 PM Mar 06, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

आनेवाडी : 

Advertisement

आशियाई महामार्गावर विरमाडे नजीक मुंबईहुन पाटणच्या दिशेने जाणाऱ्या स्लीपर कोच ट्रॅव्हल बसला सकाळच्या सुमारास शॉटसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत बसचे जवळपास पाच लाखाचे नुकसान झाले असल्याची माहिती घटना स्थळावरून मिळाली. या बसला पाठीमागील बाजूस आग लागल्याचे समजताच बस चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच बस सेवा रस्त्यावर घेत बसमधील प्रवासी असलेल्या विद्यार्थ्यांना उतरवल्याने मोठा अनर्थ टळल्याने जीवितहानी झाली नाही.

Advertisement

याबाबत पोलीस प्रशासन व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार श्प्48 ण्Q 3073 या क्रमांकाची स्लीपर कोच ट्रॅव्हल्सचे चालक महंमद शेख हे मुंबई नालासोपारा येथून पाटणकडे आयआयटी पवईच्या विद्यार्थ्यांना घेऊन निघाले होते. आनेवाडी टोल नाका नजिकच्या विरमाडेनजीक येताच सकाळी 8 वाजून 50 मिनीटांनी भारत पेट्रोलियम पंपाजवळ बसच्या पाठीमागील बाजूस शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्याने बस महामार्गावरून सेवा रस्त्यावर घेवून थांबवली. व तात्काळ बसमधील 32 विद्यार्थ्यांना खाली उतरवले. बसमधील विद्यार्थ्यांना खाली उतरवल्यानंतर बसने मोठ्या स्वरूपात पेट घेतला.

दरम्यान, आगीची माहिती मिळताच महामार्ग पोलीस व भुईंज पोलिसांनी तात्काळ आगीची माहिती सातारा व वाई अग्निशमन विभागाला व किसनवीर कारखाना यांना दिल्यानंतर काही वेळातच अग्निशमन विभागाच्या गाड्या अपघातस्थळी पोहचून आग विझविण्यास सुरवात केली. व अर्ध्या तासात आग विझवली. यावेळी भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व कर्मचारी व महामार्ग पोलिसांनी वेळीच परिस्थिती आटोक्यात आणल्याने होणारा मोठा अनर्थ टळला. याबाबत भुईंज पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास स. फौ. दत्तात्रय शिंदे व ए एस आय राजे करत आहेत.

32 विद्यार्थी या बसमधून प्रवास करत होते. आग लागल्याचे समजताच चालकाने बस सेवा रस्त्यावर घेतली व फक्त पाचच मिनिटात आपले सर्व साहित्य घेऊन हे विद्यार्थी खाली उतरले. जर बस दरवाजा उघडता आला नसता तर नक्कीच गभीर प्रकार घडू शकला असता. सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

यावेळी बसने अचानक पेट घेतल्याने बसमध्ये असणारे विद्यार्थी खूप घाबरलेल्या अवस्थेत होते. मात्र भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि रमेश गर्जे व पोलीस नाईक सुशांत धुमाळ यांनी त्यांची भेट घेऊन शांत केले, व त्यांना दुसऱ्या बसने पाटणकडे रवाना केले.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article