लुथरा बंधूंना पुन्हा कोठडी
12:34 PM Feb 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
पणजी : हडफडे येथील बर्च नाईट क्लबमधील अग्निकांड प्रकरणातील प्रमुख संशयित लुथरा बंधूंचा जामीन अर्ज म्हापसा येथील सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. सौरभ आणि गौरव हे दोघे लुथरा बंधू सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निवाडा स्थगित व राखून ठेवण्यात आला होता. हे प्रकरण गंभीर असल्याने लुथरा बंधूंना जामीन देण्यात येऊ नये, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. तो न्यायालयाने मान्य करून जामीन अर्ज फेटाळून निकालात काढला. त्यामुळे जामिनावर सुटण्याचे लुथरा बंधूंचे स्वप्न भंगले असून त्यांना कोठडीतच राहण्याची पाळी आली आहे.
Advertisement
Advertisement