For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लुथरा बंधूना 12 दिवस न्यायालयीन कोठडी

11:41 AM Dec 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
लुथरा बंधूना 12 दिवस न्यायालयीन कोठडी
Advertisement

गुप्ताच्या पोलिस कोठडीत पाच दिवसांची वाढ

Advertisement

पणजी : हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ क्लबच्या आग दुर्घटनाप्रकरणातील संशयित तथा क्लबचे मालक सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा यांना म्हापसा न्यायालयाने 12 दिवस, म्हणजे 9 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा आदेश दिला आहे.  न्यायालयाने कोठडीपूर्वी त्यांच्या वैद्यकीय तपासणीची आणि तुऊंगात त्यांना विहित औषधे पुरवण्याची परवानगी दिली आहे.

हणजूण पोलिसांनी दहा दिवसांची कोठडी संपल्यानंतर संशयित लुथरा बंधूंना 26 डिसेंबर रोजी म्हापसा न्यायालयात हजर केले असता त्यांना अजून चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. आता पोलिस कोठडीचा कालावधी समाप्त करताना न्यायालयाने 12 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Advertisement

दरम्यान, कांदोळी आरोग्य केंद्राचा बनावट ना हरकत दाखल्याचा वापर करून बर्चसाठी उत्पादन शुल्क परवाना मिळवण्यासाठी कागदपत्रांची कथितपणे  बनवटगिरी केल्याच्या आरोपाखाली रोमियो लेन नाईट क्लबचा सहमालक अजय गुप्ता याच्या पोलिस कोठडीत म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने  पाच दिवसांची वाढ केली आहे. सुनावणीदरम्यान गुप्ता याने आपण पोलिस तपासात सहकार्य करण्यास तयार असल्याचे न्यायालयाला सांगितले.

Advertisement
Tags :

.