For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लुथरा बंधूंच्या कोठडीत पुन्हा चार दिवसांची वाढ

08:28 AM Dec 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
लुथरा बंधूंच्या कोठडीत  पुन्हा चार दिवसांची वाढ
Advertisement

सह-आरोपीला सशर्त जामीन मंजूर :  हडफडे ‘बर्च’ नाईट क्लब अग्नितांडवहडफडे ‘बर्च’ नाईट क्लब अग्नितांडव

Advertisement

खास प्रतिनिधी

म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने बर्च नाईट आग प्रकरणातील मुख्य आरोपी लुथरा बंधूंच्या कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे. तर, सह-आरोपी असलेल्या भरतसिंग कोहलीला सशर्त जामीन मंजूर केला आहे.  हणजूण पोलिसांनी दहा दिवसांची कोठडी संपल्यानंतर संशयित लुथरा बंधूंना काल शुक्रवारी म्हापसा न्यायालयात हजर केले असता त्यांना अजून चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन आगप्रकरणातील क्लबचे मालक सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा या बंधूंना म्हापसा न्यायालयाने 4 दिवसांची अतिरिक्त पोलिस कोठडी सुनावली आहे.  कांदोळी आरोग्य केंद्राचा बनावट ना हरकत दाखलाप्रकरणी संशयितांनी जामीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर 29 डिसेंबर रोजी म्हापसा अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Advertisement

या प्रकरणातील सह आरोपी भरतसिंग कोहलीने दाखल केलेल्या जामीन अर्जावरील आपला आदेश न्यायालयाने 26 डिसेंबरपर्यंत राखून ठेवला होता. त्यावर काल शुक्रवारी सुनावणी पूर्ण झाल्यावर त्याची सशर्त जामिनावर सुटका करण्यात आली आहे. उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हासत्र न्यायाधीश द्विजपल पाटकर यांनी संशयित भरतसिंग कोहली याचा जामीन अर्ज 50 हजार हमी रक्कम आणि तितक्याच रकमेचा हमीदार पेश करण्याच्या अटींवर मंजूर केला आहे. महिन्याच्या दर सोमवारी हणजूण पोलिसात हजेरी लावणे, साक्षी पुराव्यांत हस्तक्षेप न करणे, आमिष न दाखवणे, देशाबाहेर न जाणे, पारपत्र न्यायालयात सादर करणे व इतर अटींचाही त्यात समावेश आहे. संशयिताला पोलिसांनी 7 डिसेंबर रोजी अटक केली होती. त्यानंतर तो कोठडीत होता.

Advertisement

.